मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा
मंगळवेढा ( प्रतिनिधी )
मंगळवेढा नगरपालिकेचा पक्षनेते निवडताना आपणास विश्वासात घेतले नसल्याची तक्रार मंगळवेढा नगरपरिषदेच्या १० नगरसेवकांनी सह्यानिशी एका अर्जाद्वारे मंगळवेढा नगरपरिषद काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडीचे अध्यक्ष राहुल शहा यांचेकडे केली आहे.
मंगळवेढा नगरपालिकेत काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी असून या आघाडीची नोंदणी करून त्याचे अध्यक्षपद हे रतनचंद शहा बँकेचे चेअरमन राहुल शहा हे भुषवित आहेत.
२० जून रोजी राहुल शहा यांनी पक्षनेता म्हणून पांडुरंग नाईकवाडी यांची निवड केल्याचे जिल्हाधिका – यांना या १० नगरसेवकांना वृत्तपत्रातून समजले . हे १० नगरसेवक आघाडीचे सदस्य असून पक्षनेता बदल करणेबाबत त्यांचे सोबत चर्चा केली नाही व आघाडीच्या सदस्यांची बैठक बोलावली नाही.
आघाडीचे अध्यक्ष , उपाध्यक्ष , सचिव व सर्व सदस्यांची बैठक घेवून चर्चा करून आणि ठराव संमत करून पक्षनेता निवडणे कायदेशिररित्या गरजेचे असताना राहुल शहा यांनी स्वतःच्या अधिकारात पहिल्या पक्षनेत्याला बदलून नवीन पक्षनेत्याची नेमणूक केली आहे ती या नगरसेवकांना मान्य नसल्याचे त्यांनी त्या अर्जात म्हटले असून त्यावर नगरसेवक अजित जगताप , चंद्रकांत घुले , प्रविण खवतोडे , राहुल सावंजी , सब्जपरी मकानदार , बशीर बागवान , संकेत खटके , राजश्री टाकणे व अनिता नागणे,भागीरथी नागणे आदिंच्या सह्या आहेत.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज