टीम मंगळवेढा टाईम्स ।
विधान परिषद निवडणूकी आधी १३ विविध महामार्ग प्रकल्पाच्या कामांचे भूमीपूजन व लोकार्पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रिमोटचे कळ दाबून आभासी प्रणालीद्वारे सोमवारी करण्यात आले.
हा कार्यक्रम आ.प्रशांत परिचारक, आ.समाधान आवताडे यांच्यासह पंढरपूर विभागातील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांना उर्जा देणारा ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना पंढरपूर- मंगळवेढा मतदारसंघ पोटनिवडणूकीत राष्ट्रवादीकडे असणारा जागा ताब्यात घेण्यात आ.परिचारक व आ.समाधान आवताडे यांच्यामुळे यश आले असताना आता केंद्रीय पातळीवरील नेत्यांनी पंढरपूर येथील कार्यक्रमाला हजेरी लावत आगामी विधान परिषद निवडणूकीआधी वातावरण निर्मितीचा प्रयत्न केला आहे.
गेल्या दीड दोन वर्षांपासून वाखरी ते पंढरपूर या मार्गाचेही काम मार्गी लागावे यासाठी आ.प्रशांत परिचारक यांच्याकडून प्रयत्न सुरू होता.
केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांनी त्याची दखल घेत या कामासाठी ७४ कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात येत असल्याची घोषणा केली.
रेल्वे मैदान येथील कार्यक्रमाआधी पंतनगर येथे ना.नितीन गडकरी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासाठी स्नेहभोजन घेतले.
पंढरपूर परिसरात भाजपाला ताकद देण्यासाठीचा प्रयत्न वरिष्ठ पातळीवरून सुरू असून, आगामी विधान परिषद निवडणूकीत भाजपाकडून परिचारक हेच उमेदवार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
पंढरपूर हे तीर्थक्षेत्र असल्याने याठिकाणी राज्य परराज्यातून दररोज हजारो भाविक विठ्ठल दर्शनासाठी येत असतात. राज्य शासनाकडून या भाविकांसाठी सेवा सुविधा पुरविण्यात येत आहेत.
वारकरी, भाविक यांना समोर ठेवत रस्ते कामांचे भूमीपूजन व लोकार्पण कार्यक्रमातून केंद्र सरकारही कशा प्रकारे भाविकांसाठी कामे करते आहे , हे दाखविण्याचा प्रयत्न झाला.
वारकरी संप्रदाय, भागवत धर्म याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला. भाजपाची हिंदुत्ववादी विचारधारा पुढे नेत असताना त्याला आध्यात्माच टच देण्यात येत आहे.
पंढरपूर येथील कार्यक्रमातून पुन्हा एखदा ते पुढे आले आहे. पंढरपूर येथील कार्यक्रम आयोजनात आ. प्रशांत परिचारक व आ. समाधान आवताडे यांनी महत्वाची बजावली. या दोन्ही नेत्यांनी कार्यक्रम यशस्वी करून विरोधी पक्षांना आपली ताकद दाखवून दिली आहे.(स्रोत:पुण्यनगरी)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज