mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

माजी आमदार प्रशांत परिचारक यांना भाजपने दिली मोठी जबाबदारी; महाराष्ट्र राज्य सहकार कृषी पणन मंडळाच्या अध्यक्षपदी निवड

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 16, 2024
in मंगळवेढा, सोलापूर
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पांडुरंग परिवाराकडून गावोगावी बैठकांचे सत्र सुरू; विधानसभेसाठी मोर्चेबांधणी की…; कार्यकर्त्यांकडून असा आग्रह

टीम मंगळवेढा टाईम्स ।

राज्य सरकारने काही दिवसांपूर्वीच स्थापन केलेल्या परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आशिष दामले तर महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या उपाध्यक्षपदी तुषार पवार व बापू भेगडे यांची निवड करण्यात आली आहे.

या निवडीनंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी अभिनंदन केले आहे. दुसरीकडे राज्य सरकारने राज्यातील 27 महामंडळांवर अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य म्हणून अनेकांना संधी दिली आहे.

ऐन विधानसभा निवडणुकांच्या राजी-नाराजी नाट्यापूर्वीच अनेकांचं बंड थमवण्याचा सरकारने प्रयत्न केला आहे.

त्यामध्ये, महाराष्ट्र राज्य सहकार कृषी पणन मंडळाच्या अध्यक्षपदी भाजप नेते प्रशांत परिचारक यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे, आगामी विधानसभा निवडणुकीत पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून प्रशांत परिचारक निवडणुकीच्या रिंगणात उतरणार की नाही, याची चर्चा रंगली आहे.

राज्य सरकारने याच महिन्यात मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेतले होते, त्यामध्ये विविध महामंडळांच्या निर्माणाची घोषणा केली होती.

त्यात, परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना 3 ऑक्टोबर 2024 रोजी शासन निर्णय (नियोजन विभाग) कंपनी अधिनियम 2013 च्या कलम 8 मधील तरतुदीनुसार करण्यात आली होती. त्यानुसार आज आशिष दामले यांची निवड करण्यात आली.

तर तुषार पवार आणि बापू भेगडे यांची महाराष्ट्र कृषी विद्यापीठ अधिनियम 1983 मधील कलम 12 (2)(ब)मधील तरतुदीनुसार संदर्भ क्र. 1 अन्वये ही निवड करण्यात आली आहे.

दरम्यान, महामंडळावर निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी अभिनंदन केले आहे. तर, पंढरमधून विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या भाजपच्या प्रशांत परिचारक यांना सहकार कृषी पणन महामंडळाच्या अध्यक्षपदी संधी देण्यात आली आहे.

राज्यातील 27 महामंडळांवर नियुक्त्या

महाराष्ट्र रोजगार हमी परिषद – शहाजी पवार, अध्यक्ष
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ – दिलीप कांबळे, अध्यक्ष
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक समिती – सचिन साठे, उपाध्यक्ष
महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोग – सतीश डोगा अध्यक्ष, मुकेश सारवान उपाध्यक्ष
वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ – निलय नाईक, अध्यक्ष

महाराष्ट्र राज्य सहकार विकास महामंडळ – अरविंद पोरट्टीवार, अध्यक्ष
महाराष्ट्र राज्य सहकार कृषी पणन मंडळ – प्रशांत परिचारक, अध्यक्ष
मौलाना आझाद अल्पसंख्यांक विकास महामंडळ – इद्रिस मुलतानी, अध्यक्ष

महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ – प्रमोद कोरडे, अध्यक्ष
महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषद – प्रमोद कोरडे, अध्यक्ष

पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र राज्य मेंढी व शेळी विकास महामंडळ – विजय वडकुते अध्यक्ष,
बाळासाहेब किसवे, संतोष महात्मे उपाध्यक्ष
महाराष्ट्र राज्य पेट्रोकेमिकल्स महामंडळ – अतुल काळसेकर, अध्यक्ष

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ – राजेश पांडे, अध्यक्ष
महाराष्ट्र राज्य गोपीनाथ मुंडे ऊस तोड कामगार मंडळ – गोविंद केंद्रे, अध्यक्ष
महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्रा) – बळीराम शिरसकर, सदस्य

राजे उमाजी नाईक आर्थिक विकास मंडळ – दौलत नाना शितोळे, उपाध्यक्ष
महाराष्ट्र वन विकास महामंडळ – अतुल देशकर, उपाध्यक्ष

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक वेतन समिती – नरेंद्र सावंत, अध्यक्ष
महिला आर्थिक विकास महामंडळावर (माविम) – मिनाक्षी शिंदे,अध्यक्षा, राणी द्विवेदी, उपाध्यक्ष
आदिवासी विकास महामंडळ – काशिनाथ मेंगाळ, अध्यक्ष

कै मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळ – विजय चौगुले, उपाध्यक्ष
आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, मुंबई – अजय बोरस्ते, उपाध्यक्ष
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ – भाऊसाहेब चौधरी, उपाध्यक्ष
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळांवर – आनंद जाधव, उपाध्यक्ष

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ – कल्याण आखाडे, उपाध्यक्ष
राज्य कंत्राटी कामगार सल्लागार मंडळ – श्रीनाथ भिमाले, अध्यक्ष
महाराष्ट्र राज्य ग्राहक सरेक्षण परिषद – संदीप लेले अध्यक्ष, अरुण जगताप उपाध्यक्ष

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: प्रशांत परिचारकभाजप

संबंधित बातम्या

मोठी बातमी! मंगळवेढ्यात हुंड्यासाठी सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती, सासू, दीर, सासर्‍यांविरोधात गुन्हा दाखल

आम्हाला मुलगाच हवा होता! पोटच्या लेकीला आणि सुनेस ठरवले ‘पांढऱ्या पायाची’; उपाशी ठेवून काढले घराबाहेर; मंगळवेढ्यात सासरच्यांचा अमानुष छळ; पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

April 14, 2026
जनता संभ्रमात! भगीरथ भालकेंचे नेमकं चाललंय तरी काय, दोन दिवसात दोन वेगवेगळ्या पक्षाकडून भरले अर्ज; पंढरपूर-मंगळवेढ्याच्या जागेबाबत सस्पेन्स आणखी वाढला?

भगीरथदादा आता प्रवास पुरे! ‘पक्षांतराचा प्रवास आता थांबवा’; सिद्धाराम म्हेत्रेंचा भगीरथ भालकेंना रोखठोक सल्ला

April 13, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

काळीज पिळवटून टाकणारी घटना! शेततळ्यात बुडून बहीण-भावाचा अंत; आजीसमोरच काळाचा घाला; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

April 13, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

मंगळवेढेकरांची प्रतीक्षा आता संपणार ! महात्मा बसवेश्वर स्मारकाची जागा निश्चित; निधी कमी पडू देणार नाही; आमदार समाधान आवताडेंची ग्वाही

April 13, 2026
Breaking! मंगळवेढ्याच्या दोन ‘नायब तहसीलदारां’ची तहसीलदार पदावर पदोन्नती

संतापजनक! घरजागा नावावर करण्यास नकार; पोटच्या मुलानेच वृद्ध आईला घराबाहेर हाकलले; न्यायासाठी वृद्धेची पोलिस अधीक्षकांकडे धाव

April 12, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

बापरे..! सोलापुरातील वकिलास जीएसटीची १२१ कोटी दंडाची नोटीस; काय आहे नेमके प्रकरण?

April 12, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

Breaking! मंगळवेढ्यात शासकीय नियमांची ऐशीतैशी; दालनात वाढदिवस साजरा करणे पडणार महागात; गटविकास अधिकारी यांचा अहवाल सादर करण्याचे पुण्यातून फर्मान

April 12, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

अनिल सावंत ‘स्वगृही’ तर भालके ‘नाथांच्या’ चरणी; मंगळवेढा-पंढरपूरच्या राजकारणात ‘विठ्ठल’ कोणाला पावणार?

April 12, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

मोठी बातमी! मंगळवेढ्यात सख्खा भाऊच बनला ‘यमदूत’; कुऱ्हाडीच्या एका वाराने होत्याचे नव्हते झाले; खुनामागचं खरं कारण वाचून अंगावर येईल काटा

April 11, 2026
Next Post
भारतात आता ‘अंधा कानून’ नसेल, न्यायदेवतेच्या डोळ्यावरील काळी पट्टी हटवली; हाती तलवारी ऐवजी आता असणार संविधान

भारतात आता 'अंधा कानून' नसेल, न्यायदेवतेच्या डोळ्यावरील काळी पट्टी हटवली; हाती तलवारी ऐवजी आता असणार संविधान

ताज्या बातम्या

मोठी बातमी! मंगळवेढ्यात हुंड्यासाठी सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती, सासू, दीर, सासर्‍यांविरोधात गुन्हा दाखल

आम्हाला मुलगाच हवा होता! पोटच्या लेकीला आणि सुनेस ठरवले ‘पांढऱ्या पायाची’; उपाशी ठेवून काढले घराबाहेर; मंगळवेढ्यात सासरच्यांचा अमानुष छळ; पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

April 14, 2026
जनता संभ्रमात! भगीरथ भालकेंचे नेमकं चाललंय तरी काय, दोन दिवसात दोन वेगवेगळ्या पक्षाकडून भरले अर्ज; पंढरपूर-मंगळवेढ्याच्या जागेबाबत सस्पेन्स आणखी वाढला?

भगीरथदादा आता प्रवास पुरे! ‘पक्षांतराचा प्रवास आता थांबवा’; सिद्धाराम म्हेत्रेंचा भगीरथ भालकेंना रोखठोक सल्ला

April 13, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

काळीज पिळवटून टाकणारी घटना! शेततळ्यात बुडून बहीण-भावाचा अंत; आजीसमोरच काळाचा घाला; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

April 13, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

मंगळवेढेकरांची प्रतीक्षा आता संपणार ! महात्मा बसवेश्वर स्मारकाची जागा निश्चित; निधी कमी पडू देणार नाही; आमदार समाधान आवताडेंची ग्वाही

April 13, 2026
Breaking! मंगळवेढ्याच्या दोन ‘नायब तहसीलदारां’ची तहसीलदार पदावर पदोन्नती

संतापजनक! घरजागा नावावर करण्यास नकार; पोटच्या मुलानेच वृद्ध आईला घराबाहेर हाकलले; न्यायासाठी वृद्धेची पोलिस अधीक्षकांकडे धाव

April 12, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

बापरे..! सोलापुरातील वकिलास जीएसटीची १२१ कोटी दंडाची नोटीस; काय आहे नेमके प्रकरण?

April 12, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..