mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मोठा धक्का! आमदार भारत भालके यांचे निधन

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 27, 2020
in राजकारण, राज्य, सोलापूर
आमदार भालके यांची प्रकृती स्थिर, अफवांवर विश्वास ठेवू नये : व्यंकट भालके

टीम मंगळवेढा टाइम्स ।

राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांचे शुक्रवारी मध्यरात्री पुण्यात निधन झालं. ते 60 वर्षांचे होते.

गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात उपचार सुरु होते. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. आमदार भारत भालके यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे काल रुबी हॉल रुग्णालयात गेले होते.

ऑक्टोबर महिन्यात भारत भालके यांना कोरोनाची लागण झाली होती. काही दिवसांच्या उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले होते. मात्र, गेल्या आठवड्यात त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली. त्यानंतर भारत भालके यांना रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

त्यांना किडनी आणि मधुमेहाचा त्रास होता. गुरुवारी रात्रीपासून भारत भालके यांची तब्येत सातत्याने खालावत गेली. कोरोनामुळे त्यांच्या अवयवांवर परिणाम झाला होता. त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी झाली होती. गेल्या काही तासांपासून ते जीवनरक्षक प्रणालीवर (व्हेंटिलेटर) होते.

भारत भालके हे पश्चिम महाराष्ट्रातील मातब्बर नेत्यांपैकी एक होते. 1992 साली ते तालुका स्तरावरील राजकारणात सक्रिय झाले. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून त्यांनी कारकिर्दीला सुरुवात केली. 2002 पासून त्यांना या कारखान्याच्या अध्यक्षपदावर आजपर्यंत कायम वर्चस्व ठेवले आहे.

भारत भालके हे सलग तिसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून आमदार झाले होते. मात्र तिन्ही वेळा ते वेगवेगळ्या पक्षातून सभागृहात पोहोचले. 2009 साली पंढरपूर विधानसभा मतदारसंघात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा पराभव करत भारत भालके हे जायंट किलर ठरले होते. 2019 साली माजी आमदार (कै.) सुधाकर परिचारक यांचा त्यांनी पराभव केला होता.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि विवाहित मुली असा परिवार आहे. सकाळी मुळ गावी सरकोली येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

दरम्यान आ.भारत भालके यांच्या निधनानंतर संपूर्ण मतदारसंघात शोककळा पसरली आहे.

ADVERTISEMENT

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

Join WhatsApp Group for Latest News

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: आमदार भारत भालकेकोरोना निधन

संबंधित बातम्या

शेतकऱ्यांनो! सोलापूर जिल्ह्यातील तलाठी व मंडळ अधिकारी ‘या’ कारणांसाठी बेमुदत संपावर

शेतकऱ्यांनो! सोलापूर जिल्ह्यातील तलाठी व मंडळ अधिकारी ‘या’ कारणांसाठी बेमुदत संपावर

January 19, 2021
सरपंच पदासाठी होतीये रस्सीखेच! ‘या’ प्रवर्गातील जागा अधिकाधिक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न

खळबळ! परिचारक गटाकडे सत्ता असलेल्या ‘या’ गावात सत्तांतर झाल्याने दंडवत घालत त्याने गाठले विठ्ठल मंदिर

January 19, 2021
सोलापूर जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांचे आरक्षण जाहीर, ‘या’ तारखेला होणार गावनिहाय आरक्षण

ठरलं! सोलापूर जिल्ह्यात सरपंच पदाची आरक्षण सोडत ‘या’ तारखेला होणार

January 19, 2021
आवताडेंची पॉवर, मंगळवेढ्यात अनेकांना धक्का देत तब्बल ‘इतक्या’ ग्रामपंचायतींमध्ये दणदणीत विजय

आढावा! सोलापूर जिल्ह्यात स्थानिक आघाड्यांची सरशी

January 19, 2021
Breaking ! आता निवडणुकीनंतरच समजणार गावाचा सरपंच; आरक्षण सोडत १५ जानेवारीनंतर

Breaking! सरपंच आरक्षण सोडत तारीख ठरली! एकाच दिवशी अर्ज माघार अन्‌ निवड

January 18, 2021
मंगळवेढ्यात बर्ड फ्लूचा शिरकाव! दहा किलोमीटरचा परिसर अलर्ट झोन म्हणून घोषित

Breaking! जंगलगी बर्ड फ्लूचे लोन ‘या’ गावात; ७५३ पक्षी, ११० अंडी केली नष्ट

January 19, 2021
तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता आहे; रक्तवाढीसाठी ‘या’ घरगुती उपायांचा दररोज वापर करावा!

खबरदार! विजयी मिरवणुका काढण्याचे धाडस कराल तर सावधान, काय म्हणतो आदेश; वाचा सविस्तर

January 18, 2021
Breaking! सोलापूर ग्रामीणची राष्ट्रवादी युवकची कार्यकारिणी बरखास्त

मंगळवेढा राष्ट्रवादीत गटबाजी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना बाजूला केले जाणार; कोण म्हणाले,वाचा सविस्तर

January 17, 2021
नवा नियम! तुम्ही जर PhonePe, Google Pay, Paytm वापरत असाल तर ‘ही’ बातमी वाचा

सावधान! तुम्हालाही मिळाला आहे का असा मेसेज? गृह मंत्रालयाने जारी केला अलर्ट

January 17, 2021
Next Post
हॅटट्रिक आमदार ते जनसामान्यांचा नेता; भारत भालके यांची धडाकेबाज कारकीर्द

हॅटट्रिक आमदार ते जनसामान्यांचा नेता; भारत भालके यांची धडाकेबाज कारकीर्द

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांनो! सोलापूर जिल्ह्यातील तलाठी व मंडळ अधिकारी ‘या’ कारणांसाठी बेमुदत संपावर

शेतकऱ्यांनो! सोलापूर जिल्ह्यातील तलाठी व मंडळ अधिकारी ‘या’ कारणांसाठी बेमुदत संपावर

January 19, 2021
सरपंच पदासाठी होतीये रस्सीखेच! ‘या’ प्रवर्गातील जागा अधिकाधिक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न

खळबळ! परिचारक गटाकडे सत्ता असलेल्या ‘या’ गावात सत्तांतर झाल्याने दंडवत घालत त्याने गाठले विठ्ठल मंदिर

January 19, 2021
सोलापूर जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांचे आरक्षण जाहीर, ‘या’ तारखेला होणार गावनिहाय आरक्षण

ठरलं! सोलापूर जिल्ह्यात सरपंच पदाची आरक्षण सोडत ‘या’ तारखेला होणार

January 19, 2021
आढावा! सोलापूर जिल्ह्यात स्थानिक आघाड्यांची सरशी

मरवडे ग्रामपंचायतीत सत्ता परिवर्तन सत्तेची सूत्रे ‘गाव विकास आघाडी’कडे

January 19, 2021
आवताडेंची पॉवर, मंगळवेढ्यात अनेकांना धक्का देत तब्बल ‘इतक्या’ ग्रामपंचायतींमध्ये दणदणीत विजय

आढावा! सोलापूर जिल्ह्यात स्थानिक आघाड्यांची सरशी

January 19, 2021
Breaking ! आता निवडणुकीनंतरच समजणार गावाचा सरपंच; आरक्षण सोडत १५ जानेवारीनंतर

Breaking! सरपंच आरक्षण सोडत तारीख ठरली! एकाच दिवशी अर्ज माघार अन्‌ निवड

January 18, 2021
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

Join WhatsApp Group for Latest News