mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

पाणीदार आमदार! मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी ३९ गावांना येत्या ३ ते ४ दिवसांमध्ये पाणी मिळणार; आ.आवताडे यांच्या पाठपुराव्याला यश

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
April 29, 2023
in मंगळवेढा
शेतकऱ्यांना अपुऱ्या व विस्कळीत वीज पुरवठ्यापासून दिलासा; नवीन डीपी व क्षमतावाढसाठी ६ कोटी ४९ लाखांचा निधी मंजूर; आ.समाधान आवताडे यांची माहिती

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।

गेल्या दोन वर्षांपासून मंगळवेढा तालुक्यातील बंद असलेली भोसे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना येत्या तीन ते चार दिवसांमध्ये सुरू होणार असल्याची माहिती पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी दिली आहे.

सदर योजना सुरू होण्याच्या अनुषंगाने सर्व प्रशासकीय, तांत्रिक व आर्थिक अडचणी दूर झाली असून ही योजना सुरू होण्याचा मार्ग आता मोकळा झाल्याचे आमदार आवताडे यांनी सांगितले आहे.

सदर योजना सुरू करण्यासंदर्भात आमदार समाधान आवताडे यांनी महावितरण, एमजेपी, ग्रामीण पाणीपुरवठा या खात्यातील अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन योजना चालू करण्यासंदर्भात आवश्यक पाऊले उचलून लवकरात – लवकर ही योजना सुरु करण्यासाठी सूचित केले होते.

आ.आवताडे यांच्या नेतृत्वामधील या कार्यतत्परतेमुळे भोसे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना येत्या ३ ते ४ दिवसांमध्ये सुरु करण्याच्या हालचाली आता गतिमान झाल्याची दिसून येत आहे.

तसेच सदर योजना सुरू करण्यासाठी लागणाऱ्या निधीची उपलब्धता करण्यासाठी आमदार अवताडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील व पाणीपुरवठा मंत्री ना.गुलाबराव पाटील तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडे गेल्या अनेक दिवसांपासून पाठपुरावा सुरु ठेवला होता.

मंगळवेढा तालुक्यातील भोसे गावासह ३९ गावांना ७१ कोटी रुपयांची योजना मंजूर झाली परंतु ही योजना गेल्या दोन वर्षापासून महावितरण कंपनीची एक कोटी १७ लाखाची थकबाकी तसेच पाटबंधारे विभागाची पाणीपट्टी थकित असल्याने योजना बंद आहे.

त्यामुळे या भागातील नागरिकांचे पिण्याच्या पाण्याचे हाल होत आहे. सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागल्यामुळे या भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू नये व ही योजना तातडीने सुरू व्हावी

यासाठी आमदार समाधान आवताडे यांनी महावितरण, एमजेपी व ग्रामीण पाणीपुरवठा योजनेच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन योजना चालू करण्याच्या दृष्टीने आढावा घेतला होता.

या बैठकीच्या वेळी किती गावांना पाणी मिळते, किती गावांना मिळत नाही, योजनेचे थकीत बिल, काही कामे अपूर्ण राहिले आहेत काय, नागरिकांना त्या त्या गावात उच्च दाबाने पाणी मिळते काय, मिळत नसल्यास पर्यायी उपाय योजना काय, योजना पूर्ववत चालू ठेवण्यासाठी दुरुस्ती खर्च किती येईल, दुरुस्तीचा कालावधी किती लागेल याबाबत सविस्तर चर्चा झाली होती.

तसेच थकित वीज बिल व थकीत पाणीपट्टी साठी लागणारी रक्कम टंचाई निधी, पाणीपुरवठा विभाग यांच्याकडून मिळणारा निधी, जिल्हा नियोजन मधून मिळणारा निधी याची देखील चर्चा यावेळी झाली होती.

तसेच तातडीने दुरुस्तीसाठी लागणाऱ्या खर्चाचे इस्टिमेट तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. यावेळी आमदार आवताडे यांनी येणाऱ्या उन्हाळ्यातील पाणीटंचाई ची तीव्रता पाहता ही योजना तातडीने चालू करून या भागातील नागरिकांना स्वच्छ व चांगले पाणी मिळावे यासाठी अधिकाऱ्यांनी सतर्क राहून या योजनेच्या माध्यमातून पाणीटंचाई दूर करावी अशा सूचना देखील दिल्या होत्या.

ही योजना पूर्ववत चालू ठेवण्यासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद होण्यासाठी सरकारकडे आपला पाठपुरावा राहील असेही त्यांनी त्या बैठकीवेळी सांगितले होते.

आमदार समाधान आवताडे यांनी केलेल्या या प्रयत्नांच्या माध्यमातून सदर भोसे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना येत्या तीन ते चार दिवसांमध्ये चालू होणार असल्याने या भागाच्या लाभार्थी गावातील ग्रामपंचायत संस्थांनी आपल्याकडील थकबाकी अथवा पाणीपट्टी भरून या योजनेच्या पुढील कार्यवाहीसाठी पाणीपुरवठा विभाग यांना सहकार्य करण्याचे आवाहन आमदार समाधान आवताडे यांनी केली आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: भोसे पाणी पुरवठा योजना

संबंधित बातम्या

शिक्षक बँकेवर ‘गुरुजीं’चा डंका! शिवाजी पाटील गुरुजी व गुलाबराव पाटील यांच्या निवडीनंतर मुंढेवाडीत जल्लोष, भव्य नागरी सत्कार संपन्न

शिक्षक बँकेवर ‘गुरुजीं’चा डंका! शिवाजी पाटील गुरुजी व गुलाबराव पाटील यांच्या निवडीनंतर मुंढेवाडीत जल्लोष, भव्य नागरी सत्कार संपन्न

July 13, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मंगळवेढेकरांनो लक्ष द्या! सोमवारी सकाळी ७ वाजल्यापासून ‘या’ महत्त्वाच्या मार्गांवर अचानक मोठा बदल, नक्की काय घडणार? पालिकेचा मोठा निर्णय

July 13, 2026
महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका होण्याची परिस्थिती,भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याचा दावा

उजनी पुनर्वसन जमीन घोटाळा! डमी खरेदीचे मोठे रॅकेट; एजंट झाले ‘मालामाल’, संपूर्ण रॅकेटची उच्चस्तरीय सखोल चौकशीची जनतेतून तीव्र मागणी

July 11, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

बँकेचे पैसे बुडवणे भोवले! धनश्री मल्टीस्टेटची आक्रमक वसुली; कारखान्याच्या माजी संचालकाची थेट तुरुंगात रवानगी; न्यायालयाचा मोठा दणका

July 10, 2026
Transfer! मंगळवेढा पोलिस ठाण्याकडील ‘या’ पोलिस कर्मचार्‍यांच्या अन्यत्र बदल्या; नवीन ‘हे’ आले

मंगळवेढ्यात बुलेट राजांना दणका! पोलिसांची धडक कारवाई; मॉडिफाईड सायलेन्सर अन् विना नंबर प्लेटच्या ‘या’ वाहनांवर ‘ॲक्शन’

July 10, 2026
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

पुनर्वसनाच्या जमिनीवर डोळा! जमीन तुमची, आधार कार्ड खोटे अन् अंगठा दुसऱ्याचाच; मंगळवेढ्यात उजनी जमीन घोटाळ्याचा थरार, वाचून थक्क व्हाल; एजंट मालामाल

July 10, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

आ.समाधान आवताडेंचा धडाका! मंगळवेढ्याला म्हैसाळचे, तर पंढरपूरला कॅनॉलद्वारे मिळणार पाणी; वीज पुरवठाही ८ तास होणार

July 10, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

पालकांनो सावधान! ‘अनधिकृत’ इंग्लिश शाळेचा सुळसुळाट; मुलांचे भविष्य अंधारात, स्कूल बसची सुरक्षाही रामभरोसे

July 9, 2026
महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

आगामी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर बसस्थानक परिसरात पोलिसांचे ‘मॉकड्रिल’

July 8, 2026
Next Post
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

खळबळजनक! बनावट दाखला सादर करणे भोवलं; मंगळवेढा तालुक्यातील 'या' ग्रामपंचायतीच्या सदस्याचे पद रद्द

ताज्या बातम्या

शिक्षक बँकेवर ‘गुरुजीं’चा डंका! शिवाजी पाटील गुरुजी व गुलाबराव पाटील यांच्या निवडीनंतर मुंढेवाडीत जल्लोष, भव्य नागरी सत्कार संपन्न

शिक्षक बँकेवर ‘गुरुजीं’चा डंका! शिवाजी पाटील गुरुजी व गुलाबराव पाटील यांच्या निवडीनंतर मुंढेवाडीत जल्लोष, भव्य नागरी सत्कार संपन्न

July 13, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मंगळवेढेकरांनो लक्ष द्या! सोमवारी सकाळी ७ वाजल्यापासून ‘या’ महत्त्वाच्या मार्गांवर अचानक मोठा बदल, नक्की काय घडणार? पालिकेचा मोठा निर्णय

July 13, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

कर्नाटकात ८ तास, महाराष्ट्रात फक्त २ तास वीज? भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांचा आक्रोश; शेती धोक्यात; आम्हाला कर्नाटकात जाऊ द्या; शेतकऱ्यांचा सरकारला थेट इशारा

July 12, 2026
जिल्हा दूध संघ अध्यक्ष निवडीची बैठक ‘या’ महिन्यात; आज सर्वच संचालक गैरहजर

तुकाराम मुंडे पॅटर्नचा सांगोल्यात थरकाप! ग्राहकांच्या जिवाशी खेळणारे रॅकेट रडारवर; १५ लाखांचे ३७ हजार लिटर भेसळयुक्त दूध ओतले गटारात

July 12, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

कागदपत्रे बनावट, विद्यार्थीही खोटे! सोलापुरात केंद्र सरकारच्या योजनेत मोठा गैरव्यवहार; बनावट विद्यार्थी दाखवून केंद्राची शिष्यवृत्ती लाटली

July 11, 2026
महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका होण्याची परिस्थिती,भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याचा दावा

उजनी पुनर्वसन जमीन घोटाळा! डमी खरेदीचे मोठे रॅकेट; एजंट झाले ‘मालामाल’, संपूर्ण रॅकेटची उच्चस्तरीय सखोल चौकशीची जनतेतून तीव्र मागणी

July 11, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा