टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा शहर हद्दीतील शनिवार पेठ येथे आमदार समाधान आवताडे यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते संपन्न होणार असल्याची माहिती आदित्य हिंदुस्तानी यांनी दिली.
आपल्या विकासात्मक दृष्टिकोनातून पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा कार्यक्षेत्रामध्ये विकासाची नवी पहाट निर्माण करणारे लोकप्रतिनिधी म्हणून आमदार आवताडे यांच्या कार्याचा लौकिक आहे.
आमदार आवताडे यांची सोलापूर जिल्हा नियोजन समितीवर विशेष सदस्य म्हणून निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल शनिवार पेठ येथील नागरिकांच्या वतीने आहे.
आमदार आवताडे यांचाही भव्य सत्कार करण्यात येणार आहे. आज संपन्न झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये निवड झालेल्या लोकनियुक्त सरपंच, कार्यसम्राट बचत गट, कर्तृत्ववान विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थी यांचाही यावेळी मान्यवरांच्या शुभहस्ते सत्कार संपन्न होणार आहे.
आमदार आवताडे यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या खोमनाळ नाका येथील सांस्कृतिक भवन, भारत इंगोले घर ते अर्जुन हजारे कोपरा, इंगळे गल्ली रस्ता व गटार करणे, जगदंबा मंदिर झोपडपट्टीतील महादेव माने घर ते सार्वजनिक शौचालयापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण,
चव्हाण यांच्या घरासमोरील योग भवन, सांगोला नाका ते सनगर गल्ली रस्ता काँक्रिटीकरण, सरगर गल्ली ते रेखा पवार घर रस्ता काँक्रिटीकरण, लक्ष्मी मंदिर समोर सांगोला नाका येथे हायमास्ट दिवा बसवणे आधी विकासकामांचा लोकार्पण सोहळा आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे.
सदर कार्यक्रमाप्रसंगी जवाहरलाल शेतकी हायस्कूल मधील विद्यार्थी शिवकालीन मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके व देशभक्तीपर गीते आणि नृत्ये सादर करणार आहेत. तरी नियोजित कार्यक्रमाप्रसंगी सर्व नागरिकांनी व ग्रामस्थांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज