टीम मंगळवेढा टाईम्स ।
राष्ट्रवादी सर्वेसर्वा शरद पवार यांची साक्ष आज नोंदवली जाणार आहे.आज शरद पवार साक्ष नोंदवायला जाण्याआधी त्यांना देण्यात आलेलं समन्स हे आतापर्यंतचं तिसरं समन्स होतं.
याआधी 23 आणि 24 फेब्रुवारीला शरद पवार आपली साक्ष नोंदवण्यासाठी आयोगापुढे हजर राहण्याची शक्यता होती. मात्र काही परिहार्य कारणास्तव समोर हजर राहू शकले नव्हते.
दरम्यान, आज शरद पवार साक्ष नोंदवण्यासाठी हजर राहणार असून त्यासाठी ते सकाळी मुंबईच्या सिल्वर ओक बंगल्यावरुन रवानाही झाले.
भीमा कोरेगाव प्रकरणात शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वीच एक अतिरीक्त प्रतिज्ञापत्र चौकशी आयोगाला सादर केले होते.
याशिवाय प्रत्यक्ष साक्ष नोंदविण्यासाठी ते 23 आणि 24 फेब्रुवारी रोजीच आयोगासमोर हजर होणार होते. मात्र काही कारमांमुळे त्यांना साक्ष देण्यासाठी उपस्थित राहता आले नव्हते.
त्यामुळे आयोगाने तिसऱ्यांदा समन्स बजावण्यात आले. त्यानंतर पवार हे साक्ष नोंदविण्यसाठी आयोगासमोर उपस्थित राहात आहेत.
कोरेगाव-भीमा येथे 1 जानेवारी 2018 रोजी हिंसाचार झाला होता. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटले होते.
राज्यातील सामाजिक शांतता भंग झाली होती. अशा वेळी राज्य सरकारने या हिंसाचाराच्या चौकशीसाठी एक आयोग नेमला होता.
दरम्यानच्या काळात या दंगली भडकण्यासाठी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी केलेली वक्तव्ये कारणीभूत असल्याचे म्हटले होते.
या प्रकरणी अॅड. प्रदीप गावडे यांनी मागणी केली होती की, या प्रकरणात शरद पवार यांचीही साक्ष व्हावी. त्यानंतर आयोगाने पवार यांना समन्स पाठवले.
सध्या भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास एनआयए (NIA) करत आहे. असे असले तरी दुसऱ्या बाजूला राज्य सरकारतर्फेही या प्रकरणाची चौकशी सुरु आह. ही चौकशी निवृत्त न्यायमूर्ती जे.एन. पटेल यांच्या अध्यक्षतेखालील समिती करत आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज