टीम मंगळवेढा टाईम्स ।
भारतीय जनता पक्षाचे उमेदवार, आमदार राम सातपुते यांचे ‘स्टेट्स मोबाईलमध्ये का ठेवले’ अशी विचारणा करत माळशिरस तालुक्याच्या नातेपुते येथील लक्ष्मण मगर यांना मारहाण करण्यात आली आहे.
ही मारहाण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माळशिरसचे उमेदवार उत्तम जानकर यांचे समर्थक प्रेम देवकाते आणि इतरांनी केली असून पोलिसांनी सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
‘संबंधित आरोपींना पोलिस जोपर्यंत अटक करत नाहीत, तोपर्यंत पोलिस ठाण्यासमोरून हटणार नाही ,’ अशी भूमिका आमदार राम सातपुते यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांनी घेऊन नातेपुते पोलिस ठाण्यासमोर ठिय्या मारला होता. मात्र, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या विनंतीनंतर सातपुते यांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले.
दरम्यान, मारहाण प्रकरणी प्रेम देवकाते, गोटम पांढरे, अक्षय ठोंबरे, अजित पांढरे, व इतर दोन अनोळखी व्यक्ती अशा एकूण सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अटकेच्या मागणीसाठी आमदार सातपुते यांनी पोलिस ठाण्यासमोर आंदोलन केले होते.
माळशिरस विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून भाजपचे विद्यमान आमदार राम सातपुते दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. त्यांना महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उत्तम जानकर हे निवडणूक लढवत आहेत. माळशिरसमध्ये एकतर्फी वाटणारी निवडणूक शेवटच्या टप्प्यात रंगतदार झाली आहे. त्यात या वादाची भर पडली आहे.
यासंदर्भात लक्ष्मण मगर यांनी माहिती दिली की, नातेपुते येथील अण्णाभाऊ साठे चौकात दुपारी दोनच्या सुमारास रणजित काळे यांच्याशी बोलत उभा होतो. त्यावेळी त्या ठिकाणी आलेल्या प्रेम देवकाते व इतर सहकाऱ्यांनी माझ्यासोबत वाद घातला.
तुमची गावात किती घरे आहेत. तुला लय मस्ती आली आहे, अशी विचारणा करत गचांडी पकडून शिवीगाळ करत मला मारहाण करण्यात आली. मला न्याय मिळावा, अशी मागणी मगर यांनी केली.
शिवीगाळ आणि मारहाणीचा प्रकार आज लक्ष्मण मगर यांच्याबाबत झाला आहे. हे सर्व माळशिरस तालुक्यात होणार आहे. पण कोणीही घाबरू नये; कारण लक्ष्मण मगर एकटे नाहीत, त्यांच्या पाठीशी संपूर्ण तालुका आहे. पोलिसांनीही आरोपीला पाठीशी न घालता तातडीने अटक करावी, अशी मागणी आमदार राम सातपुते यांनी केली.
नातेपुत्याचे सहायक पोलिस निरीक्षक महारुद्र परजणे यांनी, उमेदवार आमदार राम सातपुते यांना मी संबंधित आरोपीस लवकरच अटक करण्यात येईल, त्यासाठी पोलिस पथक पाठवले आहे, असे सांगितले. मात्र, सातपुते हे ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. मात्र, वरिष्ठ पोलिसांच्या विनंतीनंतर आमदार सातपुते यांनी आंदोलन मागे घेतले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज