टीम मंगळवेढा टाईम्स । समाधान फुगारे
मंगळवेढा तालुक्यातील एका ग्रामपंचायतीने गावातील दिव्यांग बांधवांसाठी घरपट्टी व पाणीपट्टी 50 टक्के माफ केली असून या निर्णयाचे तालुक्यात कौतुक होत आहे.
जागतिक अपंग स्वयसहायता दिनाचे औचित्य साधून भालेवाडी ग्रामपंचायत येथे दिव्यांग व्यक्तीचे दिव्यांग मेळावा आयोजित केला होता.
या मेळाव्यात 50% घर पट्टी, पाणी पट्टी माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला. याची अंमलबजावणी चालू वर्षात करण्यात आले आहे.
याप्रसंगी नवनिर्वाचित सरपंच श्रीकांत दवले, उपसरपंच लिंगेश्वर गवळी, ग्रामसेवक दत्तात्रय गाकवाड तसेच तुळसिराम घाडगे, महादेव भोरकडे, गुरुनाथ शिवशरण, पांडुरंग गवळी,
नवनाथ दवले, मच्छिंद्र गवळी, डोके गुरुजी, संगीता रणे, दुशिला गवळी सुमन शिवशरण, कुणाल गवळी, केराप्पा गवळी, अभिमन्यू शिवाशरण तसेच प्रहार अपंग स्वयं सह्यात्ता समूहाचे (प्रहार अपंग बचत गट) सर्व पदाधिकारी इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.
या प्रसंगी गायकवाड ग्रामसेवक यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली व सरपंच श्रीकांत दवले यांनी विविध योजनेची माहिती सांगितली व गुरुनाथ शिवशरण यांनी UDID प्रमाण पत्र ची माहिती सांगितली.
दरम्यान भालेवाडी ग्रामपंचायत प्रमाणे तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीने दिव्यांग बांधवांसाठी हा निर्णय लागू करावा अशी मागणी पुढे येऊ लागली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज