टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तालुक्यातील लवंगी येथील भैरवनाथ शुगर या साखर कारखान्याचे गाळप तीन लाख मे.टन यशस्वीरित्या पूर्ण झाले असल्याची माहिती व्हाईस चेअरमन अनिल सावंत यांनी दिली आहे.
दहाव्या गळीत हंगामामध्ये तीन लाख मॅटिक टन उसाचे गाळप पूर्ण केल्याबद्दल आधिकारी, कर्मचारी, ऊस उत्पादक शेतकरी, ऊस तोडणी वाहतूक, ठेकेदार अनेक हितचिंतकांचे हार्दिक अभिनंदन कारखान्याच्या प्रशासनाने केले आहे.
गळीत हंगाम बंद जाहीर नोटिस
कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व उत्पादक शेतकऱ्यांना कळविण्यात येते की, कारखान्याचा सन २०२२३- २४ चा ऊस गळीत हंगाम माहे फेब्रुवारी २०२४ च्या शेवटच्या आठवड्यामध्ये बंद होणार आहे.
गळीत हंगाम २०२२३-२४ साठी नोंद दिलेल्या सर्व ऊसाचे गाळप होण्याच्या दृष्टीने कार्यक्षेत्रातील ज्या ऊस उत्पादक सभासद, बिगर सभासद व उस उत्पादकांचा नोंद / करार केलेला ऊस अद्याप तोडणी अभावी तसाच उभा आहे,
त्यांनी असा नोंद केलेला ऊस त्वरित कारखान्याच्या शेती विभागाशी संपर्क साधून आपला ऊस लवकरात लवकर गळीतास आणणेचा प्रयत्न करावा किंवा मालक तोडीने ऊस गळीतास पाठवावा.
वरील मुदतीत कारखान्याकडे ऊस गाळीतासाठी न आल्यास अथवा गळीता अभावी ऊस क्षेत्र शिल्लक राहिल्यास त्यास कोणत्याही प्रकारचे नुकसानीस कारखाना जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. जनरल मॅनेजर भैरवनाथ शुगर वर्क्स लि.लवंगी
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज