मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
हॉटेल, चहा कँटीन व इतर व्यावसायिक ठिकाणी घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी शासनाने कडक भूमिका घेतली.

मंगळवेढा शहरात डिसेंबर, जानेवारी महिन्यापासून विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे.


तपासणीत घरगुती गॅस कनेक्शनचा व्यावसायिक वापर आढळून आल्यास संबंधितांचे गॅस सिलिंडर जप्त करून कायदेशीर गुन्हा नोंदवत

कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा तहसीलदार मदन जाधव यांनी दिला.


अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या शासन निर्णय क्र. पेट्रोल २०२५/प्र.क्र.५७/नापु-२७, दि. ९ डिसेंबर २०२५ नुसार

सर्व गॅस एजन्सी व व्यावसायिक आस्थापनांची तपासणी करून त्याबाबतचे अहवाल शासनास सादर करणे बंधनकारक केले आहे.

या निर्णयानुसार मंगळवेढा शहरातील सर्व हॉटेल चालक, चहा कैंटीन, उपाहारगृहे व इतर व्यावसायिकांनी वापरत असलेले गॅस कनेक्शन हे केवळ व्यावसायिक (कमर्शिअल) असणे आवश्यक आहे.


दरम्यान, अनेक ठिकाणी स्वस्त दरातील घरगुती गॅस सिलिंडरचा व्यावसायिक वापर होत असल्याच्या तक्रारी शासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर ही तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे.

गॅस एजन्सी, व्यावसायिक आस्थापने व सार्वजनिक ठिकाणी अचानक तपासण्या केल्या जाणार आहेत. ही कारवाई केवळ औपचारिक नसून, सातत्याने राबविली जाणार असल्याने नियमभंग करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

तर सिलिंडर जप्त..
तपासणीदरम्यान अवैधरीत्या घरगुती गॅस कनेक्शनचा वापर आढळल्यास सिलिंडर व संबंधित साहित्य जप्त करून संबंधितांवर कायदेशीर गुन्हा दाखल केला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
त्यामुळे सर्व व्यावसायिकांनी तत्काळ आपले कनेक्शन नियमांनुसार व्यावसायिक स्वरूपात रूपांतरित करावे, असे आवाहन तहसीलदार मदन जाधव यांनी केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












