मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क |
आमदार समाधान आवताडे यांच्या नेतृत्वाखाली दोन वर्षापूर्वी पंचवार्षिक निवडणूक लढवण्यात आली होती.
या निवडणुकीमध्ये ग्रामस्थांनी आमच्या पॅनलचे नऊपैकी नऊ जागा निवडून दिल्या होत्या व आमच्या पॅनलची एकहाती सत्ता ग्रामपंचायतीवर आली होती.
निवडणुकीनंतर पाच वर्षात प्रत्येक वर्षी एका महिलेला सरपंच पद द्यायचे असे ठरले होते.
परंतु दिलेला शब्द न पाळता पॅनलमधील राजीव बाबर, सुखदेव कलुबर्मे, मोहन सरवळे यांना विश्वासात न घेता निवडी केल्या व विश्वासघात केला. अशी प्रतिक्रिया माचणूर येथील जनार्दन शिवशरण यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
जनार्दन शिवशरण म्हणाले, दरवर्षी एका महिलेला सरपंच पदाची संधी द्यायची असे सर्वानुमते ठरलेले होते.
यावेळी दिपाली दिलीप कलुबर्मे यांचे नाव ठरले होते. परंतु तात्कालीन सरपंच पल्लवी डोके व तात्कालिन उपसरपंच उमेश डोके यांनी दोन वर्ष पद भोगले व नंतर राजीनामा दिला.
राजीनामा दिल्यानंतर दिपाली कलुबर्मे यांचे नाव सरपंच पदासाठी असताना, त्यांना डावलून आमदार समाधान आवताडे यांच्या नेतृत्वाखाली निवडुन आलेल्या नऊ पैकी काही उमेदवारांना चार-पाच दिवस बाहेर गावी नेऊन ठेवण्यात आले असा गंभीर आरोप देखील त्यांनी केला आहे.
तसेच नूतन सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडी परस्पर करण्यात आल्या. यावेळी एकाच पॅनल मध्ये निवडून आलेले करुणा शिवशरण, दिपाली कलुबर्मे, सुशांत शिवशरण यांना कुठलीही माहिती न देता परस्पर निवडी करण्यात आलेल्या आहेत असे ते म्हणाले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज