मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।
तिर्थक्षेत्र माचणूर यात्रेतून चोरीस गेलेली व अन्य ठिकाणाहून चोरीस गेलेल्या चार मोटार सायकली हस्तगत करण्यात मंगळवेढा पोलीसांना यश आल्याची माहिती पो.नि.रणजीत माने यांनी दिली.
दि.21 फेबु्रवारी रोजी तिर्थक्षेत्र माचणूर येथील श्री सिध्देश्वर यात्रेतून सायंकाळी पार्कींग केलेली एम.एच.13 बी.सी.1716 ही मोटर सायकल अज्ञात चोरट्याने चोरुन नेली होती.
माचणूर येथील सी.सी.टी.व्ही.फुटेज चेक करुन तपास केला असता ब्रम्हपुरी चौकात एक इसम मोटर सायकलसह असल्याची माहिती प्राप्त झाली.
पोलीसांनी तेथे जावून इसराईल मुजावर (वय 22 रा.बेगमपूर ता.मोहोळ) याला ताब्यात घेवून चौकशी केली असता आणखीन दोन गाड्या चोरी केल्याचे त्याने कबूल केले.
दोन मोटर सायकली या बिगर नंबरच्या असून त्यावर खाडाखोड केलेली आहे. सदर गाडीचा अभिलेख पडताळून पोलीस पुढील तपास करीत आहेत.
दि. 13 एप्रिल रोजी एस.टी.स्टँड आवारातून एम.एच.13 बी.एस.6793 ही गाडी चोरीला गेली होती. शहरात पोलीस पेेट्रोलींग करत असताना एक इसम संशयीतरित्या मोटर सायकल रस्त्याच्या
बाजूला लावून बसलेला दिसल्यावर पोलीसांनी त्याची चौकशी केली असता त्याने आपले नाव राहुल प्रविण माने (वय20 रा.चिचुंबे) असे सांगितले.
गाडीच्या कागदपत्राची मागणी केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलीसांनी अधिक खोलवर जावून चौकशी केल्यावर त्याने एस.टी.स्टँड येथून मोटर सायकल चोरल्याची कबूली दिली.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज