टीम मंगळवेढा टाईम्स ।
सतत उलट्या आणि रक्ताच्या जुलाबानं तळमळणाऱ्या तरुणाला दवाखान्यात पोहचवण्यापूर्वीच त्याच्यावर काळानं घाला घातला.
डॉक्टरांनी केलेल्या तपासणी त्यांनी मृत्यू झाल्याचं घोषित केले. बुधवारी ही घटना घडली. मनोज प्रभाकर विटकर (वय- ४०, रा. बेंबळे, ता. माढा) असे या तरुणाचे नाव आहे.
यातील तरुणाला मंगळवारी रात्रीपासून सतत उलट्या आणि रक्ताचे जुलाब होत असल्याने तो त्रासला होता. रात्रभर तो तळमळत होता.
त्याचा त्रास पहावेनासा झाल्याने त्याला अत्यवस्थ अवस्थेत खासगी वाहनाद्वारे भाऊजी अर्जुन यमपूरे यांनी येथील शासकीय दाखल केले. डॉ.पूजा लवटे यांनी त्याची तातडीने तपासणी केली असता
त्याचा घरातून रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच वाटेत मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेची सिव्हील पोलीस चौकीत नोंद करण्यात आली आहे.
मिक्सरचा स्फोट झाल्याने पंढरपुरात महिलेचा मृत्यू
मिक्सरचा स्फोट झाल्यामुळे शहरातील विस्थापितनगर येथील विवाहित महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत मयुरी अक्षय मेणकुदळे (वय ३०) यांचा मृत्यू झाला. भक्तिमार्ग विस्थापितनगर येथे मंगळवारी साडेपाच वाजण्याच्या
सुमारास या परिसरातील नागरिकांना मोठा स्फोट झाल्याचा आवाज आला. त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी दिलेल्या माहितीनुसार, तसेच पोलिसांच्या प्राथमिक तपासात मिक्सरचा स्फोट झाल्यामुळे जबर जखमी होऊन मयुरी मेणकुदळे यांचा मृत्यू झाला आहे.
घटनास्थळी विजेच्या वायरी आढळून आल्या आहेत, तसेच मृत मयुरी यांचे पोट मिक्सरमधील ब्लेडने कापले गेले असून, एक हातही तुटला होता. त्याच परिसरात शोभेची दारू
बनविण्यात येत होती. यामुळे हा फटकाच्या दारूचा स्फोट असल्याची चर्चा शहरात रंगली होती. घटनास्थळी व उपजिल्हा रुग्णालयात महिलेची माहिती घेऊन प्राथमिक तपासात पोलिस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी मिक्सरचा स्फोट झाला असल्याची माहिती दिली,
तसेच याबाबत अधिक तपासासाठी फॉरेन्सिक तंत्रज्ञानाची मदतही घेतली जाणार असल्याचे सांगितले. घटनास्थळी तातडीने अग्निशमन यंत्रणाही दाखल झाली होती.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज