मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
ग्रामपंचातीला मोठ्या प्रमाणात निधी मिळत असतो. मात्र या निधीमध्ये अपहार करून भ्रष्ट्राचार करण्यात आल्याचा आरोप सरपंच पतीवर करण्यात आला आहे.
बीड जिल्ह्यातील आरणविहीरा तागडखेल ग्रामपंचायत येथील हा प्रकार असून सरपंच पतीचा मनमानी कारभाराच्या विरोधात गावातील सामाजिक कार्यकर्ते उध्दव कारभारी शिरसाठ यांनी ग्रामपंचायत समोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
ग्रामपंचायतींच्या विकास कामासाठी १५ वित्त आयोगाचा निधी थेट दिला जात असतो. तर ग्रामपंचातीवर महिला सरपंच असल्यास त्यांच्या पतीकडूनच ग्रामपंचायतींचा कारभार चालविला जात असतो.
यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्ट्राचार केला जात असल्याचे देखील समोर आले आहे. अशाच प्रकारे बीडच्या आष्टी तालुक्यातील अरविहीरा तागडखेड येथील सरपंच पती यांनी मनमानी कारभार केला जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
काम न करता बिले काढल्याचा आरोप
अरविहीरा तागडखेड ग्रामपंचायतमध्ये असलेल्या सरपंच पतीने विकास कामांच्या निधीत भ्रष्ट्राचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. गावातील योजनेचे काम न करताच बिले उचलून घेतले आहे.
यामध्ये ग्रामपंचायत १५ वित्त आयोग, पवनचक्की फंड, सौरउर्जा फंडातूनाची अफरातफर करत सुमारे ३५ लाख रुपयांचा भ्रष्ट्राचार करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
कामांची चौकशीची मागणी
दरम्यान सदर बिलांची चौकशी करून कामे तात्काळ करावी; आशी मागणी सामाजिक कार्यकर्ते उध्दव कारभारी शिरसाठ यांनी केली आहे. तसेच याबाबत वेळोवेळी माहितीचा अधिकार देऊन सुध्दा चार ते पाच महिन्यापासून माहिती मिळत नाही.
जवळपास आठ ते दहा विविध कामांची चौकशी व्हावी. तसेच तात्काळ सर्व कामे करावेत; या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते उध्दव शिरसाठ व ग्रामस्थांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज