टीम मंगळवेढा टाईम्स।
आई दवाखान्यात अॅडमिट असल्याने शेजारी राहणाऱ्या वहिनीकडे पैसे मागितल्याने चिडून आम्हाला का पैसे मागतो म्हणून पुतण्या आणि वहिनीने सुताच्या कासऱ्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
माचणूर येथे ही घटना घडली. याप्रकरणी जखमी लक्ष्मण श्रीमंत सरवळे (वय ४५, रा. माचणूर) यांनी मंगळवेढा पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
फिर्यादीत म्हटले आहे की, फिर्यादी लक्ष्मण सरवळे हे माचणूर येथे त्याच्या तीन मुली श्रावणी, समृद्धी आणि कृष्णा एकत्र वास्तव्यास आहेत.
मोलमजुरी करून ते गुजराण गुरुवारी मजुरीहून आल्यानंतर सायंकाळी सातच्या सुमारास शेजारीच राहणाऱ्या वहिनी लता यांच्याकडे आई दवाखान्यात अॅडमिट असल्याने उपचारासाठी पैसें मागितले.
एवढ्यात पुतण्या ओंकार आला आणि त्याने आम्हाला कशाला पैसे मागतो म्हणून सुताच्या कासऱ्याने लक्ष्मणला मारहाण सुरू केली. त्यावेळी वहिनी लता यांनीही शिवीगाळ करून मारहाण केली.
आरडाओरडा ऐकून शेजारी रमेश बजरंग बराटे आणि सचिन श्रीकांत यांनी धाव घेऊन मध्यस्थी केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.(स्रोत:लोकमत)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज