mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

बठाण, उचेठाण अवैध वाळू उपसा प्रकरण चिघळले, सर्वसामान्य जनता रस्त्यावर; आमदार समाधान आवताडे यांनी लक्ष घालण्याची मागणी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 4, 2025
in मंगळवेढा, सोलापूर
वाळू आता ऑनलाईन मिळणार; ‘ना नफा, ना तोटा’ वर विक्री, नव्या धोरणाला मान्यता; यांच्या अध्यक्षतेखालील तांत्रिक समिती नेमली जाणार

मंगळवेढा टाईम्स न्युज कंपनी। समाधान फुगारे

भिमा नदी पात्रातून बठाण व उचेठाण येथे ठेकेदाराकडून दिवस रात्र सुरु असलेला वाळू उपसा तात्काळ बंद करुन गौणखनिजच्या नियमाचा भंग केल्याप्रकरणी ठेकेदार व महसूल अधिकारी यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी दामाजी चौकातून पुतळा ते तहसिल कार्यालय पर्यत हालगी मोर्चा काढून बोंब मारो आंदोलन करण्यात आले.

तसेच प्रहार संघटनेकडून प्रांताधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण देखील सुरू आहे त्यामुळे अवैध वाळू उपसा प्रकरणी सर्वसामान्य जनता रस्त्यावर उतरली असून याप्रकरणी आता आमदार समाधान आवताडे यांनी लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.

वाळू ठेकेदाराकडून बठाण व उचेठाण येथील भिमा नदी पात्रातील वाळूचा गाळमिश्रीत ठेक्यातील वाळू रात्रभर टिपर वाळू नेत असल्याने चक्क शासनाच्या मालमत्तेवर दरोडा टाकला जात आहे.

घरकूलसाठी वाळू न देता सांगली, कोल्हापूर या भागातील लोकांना वाळू देवून येथील लाभार्थ्यांला वंचीत ठेवले जात आहे. घरकूलचे सर्व्हर अनेकवेळा प्रयत्न करुनही सुरू होत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.

घरकूलच्या नावाखाली चक्क भिमा नदी गिळून टाकली जात असल्याचा आरोप आंदोलकांचा होता. वाळू ठेका बंद करणेबाबत निवेदन देवूनही महसूल अधिकार्‍यांनी कोणतीच कारवाई न केल्यामुळे आंदोलकावर मोर्चा काढण्याची वेळ आली. भविष्यात वाळू उपसा न थांबल्यास आणखीन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.

उचेठाण येथून मंगळवेढा शहर, भोसे प्रादेशिक पाणी पुरवठा,आंधळगाव पाणी पुरवठा,जलजीवन व स्थानिक पाणी पुरवठे,तसेच को.प.बंधारा असल्यामुळे येथे यारीच्या सहाय्याने वाळू उपसा केल्यानंतर पाणी गढूळ होत असल्याने तेच पाणी नारिकांना पिण्यासाठी नळाव्दारे येत आहे. भविष्यात नागरिकांच्या जीवाचे बरेवाईट झाल्यास जबाबदार कोण ? असा इशाराही आंदोलकांनी यावेळी दिला आहे.

मतदारसंघातील अत्यंत जिव्हाळ्याच्या प्रश्नावर आमदार समाधान आवताडे यांनी त्वरित लक्ष घालावे अशी मागणी आता पुढे येऊ लागली आहे.

आत्मदहन करणार

अवैध वाळू उपसा प्रकरणी संबंधित ठेकेदारवर जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत मी माझे आंदोलन सुरू ठेवणार असून आत्मदहन करणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते प्रकाश खंदारे यांनी दिला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करावी

दि 2 मे रोजी उचेठाण येथे 243 ब्रास व बठाण येथे 300 च्या वर वाळु साठा होता पण काही कारणास्तव जिल्हाधिकारी कार्यालयातुन आँनलाईन साईट बंद ठेवली होती पण तरीही तेथील वाळू ठेकेदारांनी 3 मे ला सकाळी सगळी वाळु बिगर पावतीचे टिपर व ट्रक भरुन लंपास केली यावर अधिकारी एकही बोलत नाही.

काल पुन्हा दिवस भर वाळु उपसा मोठ्या प्रमाणावर चालू आहे हे बंद झाले पाहिजे कारण याभागात एकही अधिकारी का जात नाही याची चौकशी जिल्हाधिकाय्रांशी करावी अशी मागणी ही करणार आहे.-सिदराया माळी, प्रहार दिव्यांग क्रांती जिल्हा उपाध्यक्ष.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अवैध वाळू वाहतूक

संबंधित बातम्या

मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

शेतकऱ्यांना अधिक स्थिर वीजपुरवठा मिळणार, सर्व शेतीपंप फिडरवरील कृषी ग्राहकांना थेट लाभ होणार; ‘या’ योजनेचा आमदार आवताडे यांनी घेतला आढावा

March 3, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

सोलापूर झेडपीत ट्विस्ट! अध्यक्षपदाची माळ गळ्यात पडण्यापूर्वीच दावेदाराने झटकले हात; सोलापूरच्या राजकारणात खळबळ

March 3, 2026
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

खळबळ! घराचा दरवाजा पुढे करुन कुटूंबिय झोपले, चोरट्याने घरात प्रवेश करुन 62 हजारांचा मुद्देमाल नेला चोरुन; ‘या’ गावात चोरट्याने हातोहात शेळी पळविली; मंगळवेढा तालुक्यातील प्रकार

March 3, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

​धक्कादायक! ऐन उमेदीच्या काळात तरुणीने संपवले जीवन; मंगळवेढा हादरले

March 2, 2026
मंगळवेढेकरांसाठी गुढीपाडवा धमाका! सम्राट मोटर्सची मोठी ऑफर; चक्क ९९,९९९ रुपयांत ३ ई-बाईक्स

मंगळवेढेकरांसाठी गुढीपाडवा धमाका! सम्राट मोटर्सची मोठी ऑफर; चक्क ९९,९९९ रुपयांत ३ ई-बाईक्स

March 3, 2026
खुशखबर! ‘हॉटेल महालोक’ फॅमिली रेस्टॉरंटचा आज मंगळवेढ्यात दिमाखदार शुभारंभ; एकनाथ शिंदे, मंत्री गोगावले, सोमवरनाथ महाराज, अलका कुबल या दिग्गजांच्या उपस्थितीत रंगणार सोहळा

मंगळवेढेकरांच्या पसंतीला उतरणार चवीचं नवं ठिकाण; ‘हॉटेल महालोक’ आजपासून सेवेत सज्ज; नाष्टा, स्पेशल समुद्री मासे, चिकन मटण मध्ये असंख्य व्हरायटी व व्हेज स्पेशल किचन

March 1, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! आई-वडील झोपेतून उठले नाही म्हणून जाऊन पाहिलं; तोंडातून फेस आलेला अन्…, सोलापुरात राहत्या घरात आढळला पती-पत्नीचा मृतदेह

February 28, 2026
जिल्हाधिकाऱ्यांच्या कामाला राष्ट्रीय पुरस्कार, राष्ट्रपतींच्या हस्ते आज दिल्लीत सन्मान; सोलापुर जिल्ह्यात लवकरच गडचिरोलीचा ‘आशीर्वाद’ पॅटर्न

सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा: जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी जबाबदारी

March 3, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

सुतार इंटरनॅशनल स्कूलवर कारवाईची भीती कुणाला? पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेने पालक संतप्त; २० विद्यार्थ्यांचे करिअर राख रांगोळी करणाऱ्या सुतार स्कूलवर पोलीस मेहेरबान का?

February 28, 2026
Next Post
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

विद्यार्थ्यांनो! बारावीचा निकाल आज जाहीर होणार, कुठे आणि कसा पाहायचा; मंगळवेढ्यातील सारा कॉम्प्युटर येथे निकाल मोफत पाहता येणार; निकालाची प्रिंट देखील मिळणार

ताज्या बातम्या

मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

शेतकऱ्यांना अधिक स्थिर वीजपुरवठा मिळणार, सर्व शेतीपंप फिडरवरील कृषी ग्राहकांना थेट लाभ होणार; ‘या’ योजनेचा आमदार आवताडे यांनी घेतला आढावा

March 3, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

सोलापूर झेडपीत ट्विस्ट! अध्यक्षपदाची माळ गळ्यात पडण्यापूर्वीच दावेदाराने झटकले हात; सोलापूरच्या राजकारणात खळबळ

March 3, 2026
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

खळबळ! घराचा दरवाजा पुढे करुन कुटूंबिय झोपले, चोरट्याने घरात प्रवेश करुन 62 हजारांचा मुद्देमाल नेला चोरुन; ‘या’ गावात चोरट्याने हातोहात शेळी पळविली; मंगळवेढा तालुक्यातील प्रकार

March 3, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

​धक्कादायक! ऐन उमेदीच्या काळात तरुणीने संपवले जीवन; मंगळवेढा हादरले

March 2, 2026
चल ग सखे पंढरीला…! आषाढी यात्रेसाठी आज मंगळवेढ्यातून एसटीच्या मोफत पाच फेऱ्या; दोन विठ्ठल भक्तांची भाविकांसाठी केले आयोजन

एसटीच्या तिकीटाबाबत शासनाचा युटर्न! ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग प्रवाशांना मोठा दिलासा; NCMC कार्डबाबत दिलं स्पष्टीकरण

March 3, 2026
मंगळवेढेकरांसाठी गुढीपाडवा धमाका! सम्राट मोटर्सची मोठी ऑफर; चक्क ९९,९९९ रुपयांत ३ ई-बाईक्स

मंगळवेढेकरांसाठी गुढीपाडवा धमाका! सम्राट मोटर्सची मोठी ऑफर; चक्क ९९,९९९ रुपयांत ३ ई-बाईक्स

March 3, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..