टीम मंगळवेढा टाईम्स ।
जुन्या भांडणाचा राग मनात धरून 13 महिन्याचा ऊसाचा फड पेटवून 50 हजार रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी भानुदास रामचंद्र पवार व रामचंद्र भानुदास पवार या दोघांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी किरण पवार याची बालाजीनगर येथे शेती असून गट नं.103/4 मध्ये ऊसाचे खोडवा 13 महिन्याचे उभे पिक आहे.
त्यांच्या लगत चुलत भाऊ रामचंद्र पवार याचाही ऊस कारखान्यास जावून राहिलेला पालापाचोळा पेटलेला दिसला.
यावेळी अधिक चौकशी केली असता आरोपीने तो फड दि.2 रोजी दुपारी 12.30 च्या दरम्यान पाठीमागील जुन्या भांडणाचा राग मनात धरून
सदर क्षेत्रातील अर्धा एकर ऊसाचे पिक पेटवून दिल्याने अंदाजे 50 हजाराचे नुकसान झाल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलिस करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज