टीम मंगळवेढा टाईम्स ।
स्व.आर.आर (आबा) पाटील सुंदर गाव योजनेअंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील तांडोर गावास पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग जिल्हा परिषद सोलापूर यांच्यावतीने दि.१५ ऑगस्ट रोजी यशवंतराव चव्हाण सभागृह जिल्हा परिषद सोलापूर येथे पालकमंत्री दत्तात्रय भरणे , जि.प.अध्यक्ष अनिरूध्द कांबळे, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी , उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील , जि.प.सदस्य नितीन नकाते यांच्या उपस्थितीत तांडोर गावचे सरपंच सौ.कविता सिध्देश्वर मळगे व ग्रामसेवक संगीता माने यांना तालुका सुंदर गाव सन्मान चिन्ह व सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले.
स्व.आर.आर आबा पाटील सुंदर गाव पुरस्कार योजना २०२०-२१ योजनेअंतर्गत मंगळवेढा तालुका स्तरावर घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये निर्धारीत निकषामध्ये
सोलापूर जिल्हयातील मंगळवेढा तालुक्यातून तांडोर या गावाने सर्वाधिक गुण प्राप्त केले असल्याने या गावास तालुका सुंदर गाव म्हणून गौरविण्यात येत आहे.
या पुरस्कार योजनेत सहभागी होण्यासाठी सन २०२०-२१ मध्ये प्रामुख्याने तालुक्याचे गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण, विस्तार अधिकारी साळुखे मार्गदर्शनाखाली व कै.रामचंद्र यशवंत मळगे यांच्या खूप परिश्रमामुळे गावाला स्व.आर.आर.आबा पाटील सुंदर गाव पुरस्कार मिळाला.
यासाठी सरपंच सौ.कविता मळगे, ग्रामसेवक संगीता माने, उपसरपंच रोशन शेख, सदस्य महांतेश मळगे , सदस्य अमोल गायकवाड , हरीबा मळगे, शालन भोसले, जनाबाई मळगे, ग्रा.पं. कर्मचारी नवनाथ कांबळे , तांडोरचे सर्व ग्रामस्थ यांनी खूप परिश्रम घेतले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज