मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
नागपूर – रत्नागिरी या राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित केलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला न देता पोलीस व महसुल प्रशासनास पुढे करून दंडेलशाहीने महामार्गाचे काम करणाऱ्या दिलीप बिल्डकॉन कंपनीच्या ठेकेदार व अधिकारी यांच्याविरुद्ध शेतकऱ्यांतुन संतापाचा उद्रेक होत आहे.
शेतकऱ्यांकडून दिवसेंदिवस विरोध वाढत असून महामार्गाचे अधिकारी शेतकऱ्यांना दमबाजी करून काम करण्याच्या प्रयत्नात असल्याने गेल्या दोन दिवसात मंगळवेढ्यातील वातावरण तणावपूर्ण बनले आहे.
दरम्यान बुधवारी सकाळी गणेशवाडी येथील एका शेतकऱ्याने महामार्गाचे अधिकारी शेतात अवैधरित्या जाऊन काम सुरु करण्याच्या प्रयत्नात असताना अंगावर डिझेल ओतून घेत स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला आणि हा सर्व प्रकार पोलीस खात्याच्यासमोर घडला.
मंगळवारी सकाळच्या सुमारास खोमनाळ बायपास रस्त्यालगत असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात अधिकाऱ्यांनी काम करण्यास सुरूवात केली असता त्या शेतकऱ्यांनी विरोध केल्यानंतर काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले होते़ अंधळगाव येथील शेतकऱ्यांच्या भुसंपादनाची रक्कम मिळाली नसतानाही सबंधित ठेकेदारांकडून शेतकऱ्यांना दमदाटी व बळजबरीने काम करण्याचा प्रयत्न केला जात असून याचे पर्यवसन एकमेकांना शिवीगाळ व मारहाणीचा प्रकार घडला़ याप्रकरणी मंगळवेढा पोलीस ठाण्यात एकमेकांविरोधात फिर्यादी दिल्या आहेत.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज