mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

भारत विरुद्ध इंग्लंड तिसरी कसोटी आजपासून; कोहलीच्या ‘विराट’ खेळीकडे लक्ष

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
August 25, 2021
in राष्ट्रीय
भारताचा लंकेवर 7 गडी आणि 80 चेंडू राखून मोठा विजय; टीम इंडियासमोर श्रीलंकेची हाराकिरी

टीम मंगळवेढा टाईम्स ।

कर्णधार विराट कोहली हा दीर्घकाळापासून खराब फॉर्ममध्ये आहे. आज बुधवारपासून इंग्लंडविरुद्ध सुरू होत असलेल्या तिसऱ्या कसोटीत मोठी खेळी करीत पाच सामन्यांच्या मालिकेत संघाला विजयी आघाडी मिळवून देण्याचा तो प्रयत्न करेल.

चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांचे अपयश भारतीय संघासाठी चिंतेचा विषय ठरतो. लॉर्ड्स कसोटीच्या चौथ्या दिवशी मात्र दोघांनी जवळपास ५० षटके फलंदाजी करीत फाॅर्ममध्ये परतल्याचे संकेत दिले होते.

सलामीवीर रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांची फलंदाजी मात्र भारताची सकारात्मक बाजू आहे. दोघांनी आव्हानात्मक परिस्थितीत संयम आणि तंत्र यांची झलक सादर केली. राहुल हा प्रत्येक डावात अधिक आत्मविश्वासाने खेळला.

रोहित देखील चांगल्या फॉर्ममध्ये आहे, मात्र पूलचा फटका केव्हा मारायचा हे निश्चित करण्याची गरज आहे. दोनदा तो पूलच्या फटक्यावर बाद झाला.
ऋषभ पंत नैसर्गिक खेळी करीत असून, रवींद्र जडेजा सातव्या स्थानाला न्याय देत आहे.

संघात त्याची भूमिका डावखुऱ्या फिरकी गोलंदाजाच्या तुलनेत फलंदाज म्हणून मोठी वाटते. शार्दूल ठाकूर फिट असला तरी कोहली गोलंदाजी आक्रमणात कुठलाही बदल करेल, असे वाटत नाही.

हेडिंग्लेतील स्थिती वेगवान गोलंदाजांना अनुकूल वाटत असल्याने भारत चार वेगवान गोलंदाज खेळवू शकतो. मोहम्मद सिराजमुळे वेगवान मारा आणखी भेदक बनला. सिराजने लॉर्ड्सवर पाचव्या दिवशी टिच्चून मारा करीत लक्ष वेधले होते.

दुसरीकडे डेव्हिड मलानच्या पुनरागमनामुळे फलंदाजी भक्कम होण्याची इंग्लंडला अपेक्षा आहे. मलानने अखेरची कसोटी तीन वर्षांआधी खेळली होती. तथापि, प्रथम श्रेणीचा त्याच्याकडे भरपूर अनुभव आहे.

डावखुरा मलान तिसऱ्या स्थानावर फलंदाजीला येणार असल्यामुळे हसीद हमीद हा रोरी बर्न्ससोबत डावाला सुरुवात करेल.५१ वर्षांपासून भारत हेडिंग्लेत अपराजितभारतीय संघ येथे १९ वर्षांनतर कसोटी सामना खेळणार आहे.

मागच्या वेळी २००२ ला साैरव गांगुलीच्या नेतृत्वात संघ येथे खेळला होता. भारतीय संघ येथे ५१ वर्षांपासून अपराजित आहे. त्याआधी १९६७ ला भारत येथे पराभूत झाला होता. इंग्लंड संघाची मात्र २०१९ च्या ॲशेस कसोटीत ६७ धावांवर घसरगुंडी झाली होती.

फलंदाजांसाठी खेळपट्टी आव्हानात्मक

मागच्या काही वर्षांपासून हेडिंग्लेची खेळपट्टी फलंदाजांसाठी आव्हानात्मक मानली जाते. यजमान संघ येथे दहापैकी पाच सामन्यात पराभूत झाला आहे. चार सामने त्यांनी जिंकले तर एक सामना अनिर्णीत राहिला होता.

इंग्लंडला येथे न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडीज, श्रीलंका आणि द.आफ्रिका संघांनी धूळ चारली. मागच्या दोन सामन्यात मात्र इंग्लंड या मैदानावर विजयी ठरला आहे.

विराट कोहलीने अखेरचे आंतरराष्ट्रीय शतक नोव्हेंबर २०१९ ला साजरे केले होते. सध्याच्या मालिकेत तो दोनदा ४० धावांपर्यंत पोहोचला खरा, मात्र मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. दोन्ही सामन्यात ऑफस्टम्पबाहेर जाणाऱ्या चेंडूवर विराट बाद झाला. अशावेळी हेडिंग्लेच्या खेळपट्टीवर तंत्रशुद्ध फलंदाजीची त्याच्याकडून अपेक्षा असेल.

भारताने येथे २००२ ला अखेरचा कसोटी सामना खेळला. तो सामना एक डाव ४६ धावांनी जिंकलादेखील. सध्याच्या संघातील एकाही खेळाडूला या मैदानावर खेळण्याचा अनुभव नाही. अशावेळी भारतीय संघ किती लवकर परिस्थितीशी ताळमेळ साधतील, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

उभय संघ
भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, मयंक अग्रवाल, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, केएल राहुल, रिद्धिमान साहा, अभिमन्यू ईश्वरन, पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव.

इंग्लंड : जो रूट (कर्णधार), मोइन अली, जेम्स ॲन्डरसन, जोनाथन बेयरस्टो, रोरी बर्न्स, जोस बटलर (यष्टिरक्षक), सॅम कुरेन, हसीब हमीद, डॅन लॉरेंस, साकिब महमूद, डाविड मलान, क्रेग ओवरटन, ओली पोप, ओली रॉबिन्सन (स्रोत:लोकमत)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: क्रिकेट

संबंधित बातम्या

सोलापूर ग्रामीणमध्ये आज 244 जण कोरोनामुक्त, 223 नवे रुग्ण; वीस वर्षीय तरुणीचा मृत्यू

मोठी बातमी! कोरोनानंतर आता पुन्हा एका आजाराने डोके काढले वर; रुग्णांची संख्या वाढतेय झपाट्याने, गेल्या 24 तासांत…

August 26, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

धक्कादायक! शिक्षिकेने ६ वर्षांच्या विद्यार्थ्याच्या कानशिलात लगावली; पुढच्याच क्षणी चिमुकल्याचा जागीच तडफडून मृत्यू

August 22, 2026
मंगळवेढ्याचा शूर सुपुत्र अमर झाला! श्रीनगरमध्ये कर्तव्य बजावताना जवान वैभव आवताडे यांना वीरमरण; आज रात्री पार्थिव पुण्यात येणार

मंगळवेढ्याचा शूर सुपुत्र अमर झाला! श्रीनगरमध्ये कर्तव्य बजावताना जवान वैभव आवताडे यांना वीरमरण; आज रात्री पार्थिव पुण्यात येणार

August 15, 2026
दारुडा भाऊसाहेब! गटविकास अधिकारी कार्यालयामध्ये ग्रामसेवकाचा दारू पिऊन धिंगाणा; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

मद्यप्रेमींसाठी मोठी बातमी! ओल्ड मॉन्क, आरसीसह ‘या’ दारू ब्रँड्सच्या विक्रीवर बंदी; FSSAI ने का उचललं हे पाऊल?

August 4, 2026
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

आधी जंतरमंतरवर विद्यार्थ्यांशी संवाद, नंतर पंतप्रधानांची भेट; शरद पवारांच्या दुहेरी चालीने विरोधकही धास्तावले? दिल्लीच्या राजकारणात शरद पवारांची मोठी खेळी

July 23, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय; ‘या’ एका कागदपत्राची सक्ती कायमची रद्द; लाखो विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी

June 27, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

भयंकर निष्काळजीपणा! डॉक्टरांच्या अनुपस्थितीत नर्सने केली प्रसूती; निष्पाप माता-बाळाचा बळी, चितेच्या राखेत पुरावा

June 22, 2026
Gas booking Number : आता गॅस बुकिंगसाठी संपूर्ण देशात एकच नंबर; जूना नंबर करा डिलिट

मोठी बातमी! घरगुती गॅस सिलेंडर आणखी महाग होणार; केंद्र सरकारनं सांगितलं त्यामागचं मोठं कारण..

June 9, 2026
मोठी बातमी! केंद्र सरकारचा ऊस उप्तादक शेतकऱ्यांना दिलासा, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय

मोदीजी! सामान्यांनी जगायचं कसं? ​‘अच्छे दिन’ कुठे गेले? महागाईने गाठला उच्चांक; काँग्रेसची महागाई हटवण्यासाठी भाजपला आणले, पण आता जनतेवरच ‘महागाईचा सर्जिकल स्ट्राईक’

June 8, 2026
Next Post
मंगळवेढ्यात मासे धरण्यासाठी गेलेला कॉलेजकुमार पाण्यात गेला वाहून, रेस्क्यू टीमला पाचारण; शोधकार्य सुरु

दुर्दैवी घटना! मंगळवेढ्यात १६ वर्षीय विवाहित मुलीचा पाण्यात पडून मृत्यू

ताज्या बातम्या

खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

ज्येष्ठ नागरिकांचा मोठा विजय! सुनेची याचिका फेटाळली; घराचा ताबा वृद्ध सासू-सासऱ्यांकडेच राहणार

September 27, 2026
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

​मोठी खळबळ! पोलिसांनाच गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न; पंढरपुरात आरोपींची बेधडक कृती, पाठलाग करून मुसक्या आवळल्या

September 27, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मोठी बातमी! दुष्काळाच्या झळा; दोन शेतकऱ्यांनी गमावला जीव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

September 27, 2026

राज्यात दोन टप्प्यात दुष्काळ जाहीर होणार? पहिल्या 139 तालुक्यांची यादी आली समोर; सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांचा समावेश

September 26, 2026
कै.आण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवेढयात विविध कार्यक्रम; सामाजिक कार्याबद्दल ‘यांना’ पुरस्कार जाहीर

कै.आण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त मंगळवेढ्यात आज पुरस्कार सोहळा; आमदार आवताडेंच्या हस्ते होणार सन्मान; पाहा कोणा-कोणाला मिळणार मानाचा ‘समाजभूषण पुरस्कार’?

September 25, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

घरात तहान, पाणी कर्नाटकच्या दारात! उजनी कालवाच्या गळतीमुळे मंगळवेढ्यातील शेतकरी संकटात; पाटबंधारे विभागाविरोधात संताप

September 24, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा