mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

आठवणींना उजाळा! दिगवंत आ.भारत भालके यांच्या प्रतिमेचे महिलांनी केले औक्षण

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
August 23, 2021
in मंगळवेढा, राज्य, सोलापूर

टीम मंगळवेढा टाईम्स ।

पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील प्रत्येक कुटुंबातील हजारो माता भगिनींशी बंधुत्वाचे नाते जोडणाऱ्या स्व.भारत भालके यांच्या निधनानंतर संपन्न होत असलेल्या पहिल्याच रक्षाबंधन निमित्त मरवडे येथील महिलांनी स्व.भालके यांच्या प्रतिमेचे पूजन करुन व राखी ठेवून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.यावेळी सर्वांना गहिवरुन आले.

रक्षाबंधन हा भाऊ -बहिणींच्या भावबंधनातील जिव्हाळ्याचा सण मानला जातो. हिच बाब विचारात घेऊन दोन्ही तालुक्यातील हजारो माय भगिनींशी स्व.भारत भालके यांनी बंधुत्वाचे नाते जोडले होते.

रक्षाबंधनाच्या निमित्ताने गावागावांतील हजारो महिलांना एकत्र करुन अनेकदा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन केले होते. शिवाय माहेरच्या मायेने स्नेहभोजन व साडीचोळीचा आहेर करुन जिव्हाळ्याचे नाते निर्माण केले होते. शिवाय सुख दुखाःच्या कार्यक्रमासाठी ते आवर्जून उपस्थित राहत असत.

याशिवाय लोकप्रतिनिधीच्या भूमिकेतून काम करताना महिलांच्या डोईवरील हंडा उतरवण्यासाठी त्यांनी भोसे पाणी पुरवठा योजना कार्यान्वित केली आहे. महिलांसाठी संरक्षक भूमिका,बचतगट सक्षमीकरण, आशा वर्कर व अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नांना न्याय अशा अनेक अंगांनी काम केले होते.

शिवाय महाराष्ट्राची लोकपरंपरा जतन करुन ठेवणार्या वृद्ध कलावंतांना मानधन वाढ असे विषय मार्गी लावून महिला भगिनींना दिलासा दिला होता. त्यामुळे घराघरांतील माय भगिनींशी त्यांचेविषयी स्नेहमय आपुलकी निर्माण झाली होती.

गतवर्षी नोव्हेंबर मध्ये भालके यांचे अकाली निधन झालेनंतर दोन्ही तालुक्यातील महिलांना पाठीराखा भाऊ गेल्याचे दुःख झाले होते. त्यांच्या निधनानंतर संपन्न होणाऱ्या पहिल्या सणाला या आठवणींचा गहिवर दाटून आला.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जनरल सेक्रेटरी संजय पवार यांच्या पुढाकाराने एकत्र आलेल्या मरवडे येथील महिला भगिनींनी स्व.भारतनाना यांच्या प्रतिमेचे श्रद्धेने पूजन करीत समोर राखी ठेवून आठणींना उजाळा दिला.

यावेळी माजी सरपंच ताई मासाळ, नंदाताई रोंगे ,जयश्री घुले,सारिका पवार, सुनिता बनसोडे, मालन मणेरी, प्रियंका पवार,सारिका मासाळ , कुमुदिनी चव्हाण, उषा शिवशरण, मनिषा पवार, भाग्यश्री मासाळ यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: स्व.भारत भालके

संबंधित बातम्या

भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ खपवून घेणार नाही! एफडीएचा शाळांना शेवटचा अल्टीमेटम; शाळांच्या ५० मीटर परिसरात जंक फूड विकल्यास थेट कारवाई; तुकाराम मुंढेंची शाळांवर थेट धाड

July 30, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

‘एकतर मी जाईन, नाहीतर सरकार…’; मराठा आरक्षणासाठी जरागेंचा निर्णायक एल्गार, ‘या’ तारखेला जरांगेंचं अखेरचं आंदोलन

July 30, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

ब्रेकींग! ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांच्या ‘कास्ट व्हॅलिडिटी’बद्दल सरकारने घेतला मोठा निर्णय

July 29, 2026
धक्कादायक! सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती व सासूविरुद्ध फिर्याद दाखल

मंगळवेढ्यासाठी दुःखद बातमी! कोकणात ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

July 29, 2026
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

प्रशासनाचा मोठा निर्णय! सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे विभाजन; जाणून घ्या तुमच्या भागातील नवीन उपविभाग; नागरिक व भाविकांना कसा होणार फायदा?

July 28, 2026
जयश्री महिला अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटीचा आज मंगळवेढ्यात लोकपर्ण सोहळा; सर्व बँकिंग सुविधा आता एकाच छताखाली

वाटचाल सोनपावलांची! जयश्री महिला अर्बन बँकेचा आज पहिला वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व ६ वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

July 28, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

आत्याच्या मुलाशी लग्न, पदरात 2 मुली, सुखाचा संसार सुरू असतानाच महिलेनं मुलीसह संपवलं जीवन, सोलापूर जिल्ह्यात हळहळ

July 29, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मोठी बातमी! ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणार; ‘या’ तारखेची मतदार यादी स्थगित? पाहा नवीन वेळापत्रक

July 27, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

पाणी वाहून जातंय अन् पिके करपताहेत! भीमा काठच्या शेतकऱ्यांसाठी ८ तास विजेची आमदार समाधान आवताडे यांची मुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी

July 27, 2026
Next Post
मोठी बातमी! छत्रपती शिवरायांचा जन्मोत्सव ‘शिवजयंती’ साजरी करण्याबाबत गृह विभागाचा आदेश

दातृत्व! शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी अँड.सुजित कदम यांचेकडून दोन लाखाची देणगी

ताज्या बातम्या

भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ खपवून घेणार नाही! एफडीएचा शाळांना शेवटचा अल्टीमेटम; शाळांच्या ५० मीटर परिसरात जंक फूड विकल्यास थेट कारवाई; तुकाराम मुंढेंची शाळांवर थेट धाड

July 30, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

‘एकतर मी जाईन, नाहीतर सरकार…’; मराठा आरक्षणासाठी जरागेंचा निर्णायक एल्गार, ‘या’ तारखेला जरांगेंचं अखेरचं आंदोलन

July 30, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

ब्रेकींग! ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांच्या ‘कास्ट व्हॅलिडिटी’बद्दल सरकारने घेतला मोठा निर्णय

July 29, 2026
धक्कादायक! सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती व सासूविरुद्ध फिर्याद दाखल

मंगळवेढ्यासाठी दुःखद बातमी! कोकणात ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

July 29, 2026
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

प्रशासनाचा मोठा निर्णय! सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे विभाजन; जाणून घ्या तुमच्या भागातील नवीन उपविभाग; नागरिक व भाविकांना कसा होणार फायदा?

July 28, 2026
जयश्री महिला अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटीचा आज मंगळवेढ्यात लोकपर्ण सोहळा; सर्व बँकिंग सुविधा आता एकाच छताखाली

वाटचाल सोनपावलांची! जयश्री महिला अर्बन बँकेचा आज पहिला वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व ६ वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

July 28, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..