मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
आषाढी एकादशीनंतर संतांच्या पालखी सोहळ्यांसमवेत आलेल्या भाविक वारकऱ्यांना गोपाळकाल्याचे वेध लागले आहेत. गुरूपौर्णिमेला, आज सोमवारी सकाळी ६ ते ११ वाजेपर्यंत गोपाळपूर येथे गोपाळकाल्याचा हा पारंपरिक सोहळा साजरा होत असून यासाठी प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे.
वारकरी परंपरेत सर्व उत्सवांची सांगता गोपाळकाल्याने होते. आषाढी यात्रा सोहळाही याला अपवाद नाही. आषाढ शुद्ध दशमी ते आषाढ शुद्ध चतुर्दशी या दरम्यान सर्व संतांच्या पालखी सोहळ्यांचा मुक्काम पंढरपुरात असतो.
या कालावधीत त्या-त्या मठ, मंदिरांमध्ये दररोज पूजा, भजन, कीर्तन, रात्री जागर असे कार्यक्रम सुरू असतात. द्वादशीच्या दिवशी सकाळी भाविक उपास सोडतात. रात्री कीर्तनानंतर खिरापत होते. त्रयोदशी, चतुर्दशीला सुद्धा सर्व धार्मिक कार्यक्रम होतात.
पौर्णिमेच्या दिवशी सकाळी सर्व संतांचे पालखी सोहळे हजारो वारकऱ्यांसमवेत गोपाळपूर येथे काल्यासाठी जातात. गोपाळपूर येथील टेकडीवर भगवान गोपाळकृष्णाचे पुरातन मंदिर आहे.
या ठिकाणी विविध दिंड्या व पालखी सोहळे पहाटेपासून दाखल होतात. मंदिर परिसरात ठरलेल्या ठिकाणी दिंड्या पालखी सोहळे थांबतात. प्रथेप्रमाणे काल्याचे कीर्तन होते. त्यानंतर मंदिर प्रदक्षिणा होऊन पुन्हा सर्व सोहळे पंढरपुराकडे परत निघतात.
आज सोमवारी गुरूपौर्णिमा असून गोपाळकाल्याचा सोहळा असल्याने पोलीस व सर्व प्रशासकीय विभागांनी सर्व ती तयारी केली आहे. या सोहळ्याच्या अनुषंगाने गोपाळपूर ग्रामपंचायत व श्री गोपाळकृष्ण देवस्थान समितीने स्वच्छता, आरोग्य सेवा, पाणी पुरवठा, वीज याबाबत दक्षता घेतली आहे.
संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील परतीचा पहिला मुक्काम आज वाखरी येथे असणार आहे.(स्रोत:पुण्यनगरी)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज