टीम मंगळवेढा टाईम्स ।
यंदाची आषाढी एकादशी ही २० जुलै रोजी आहे. पंढरपूर येथे यंदा आषाढी वारीसंदर्भात प्रशासनाने काही नियमावली जारी केली आहे. यंदाच्या आषाढी वारीत नऊ दिवसांची संचारबंदी करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांनी दिले आहेत.
या अनुषंगाने दि.१७ जुलैपासून ते २५ जुलै पर्यंत संचारबंदी लावण्याबाबत जिल्हाधिकारी यांना मिलिंद शंभरकर प्रस्तावही सादर केला आहे.
कोरोनाची भीती पाहता प्रशासनाने यंदाची आषाढी वारी रद्द केलेली आहे. तरी काही मोजक्या वारकरी भाविकांना पंढरपुरात वारीसाठी प्रवेश देण्यात येणार आहे.
वारीच्या निमित्ताने येत्या १७ तारखेपासून ते २५ जुलैपर्यंत पंढरपूर शहर व परिसरातील दहा गावात संचार बंदी ठेवण्याचा निर्णय पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांनी घेतला आहे.
आषाढी एकादशीच्या काळात पंढरपुरात लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात. मात्र, यंदा वरील परवानगी नाकारत पंढरपुरात नऊ दिवसांची संचारबंदी लावण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाकडून घेण्यात आलेला आहे. त्यानुसार येथील चंद्रभागा नदी परिसरातही परिसरात १४४ कलम लागू करण्यात येणार आहे.
तर सोलापूर जिल्ह्यात त्रिस्तरीय नाकाबंदी लागू करण्यात येणार आहे. संचारबंदीच्या काळात परवानगी नसलेल्या भाविकाला कोणत्याही परिस्थितीत सोलापूर जिल्ह्यात प्रवेश दिला जाणार नाही. २० जुलै रोजी यंदाची आषाढी एकादशी आहे.
मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही भाविकांना पंढरपूर यात्रेला जाता येणार नाही. पंढरपूरसह परिसरातील दहा गावात संचारबंदी करण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून मांडण्यात आला होता त्या प्रस्तावाला शासनाने हिरवा कंदील दिला आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज