टीम मंगळवेढा टाईम्स ।
महाराष्ट्र राज्याच्या प्रथेप्रमाणे आज आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा पार पडली.
त्यावेळी मंदीरात भाविक उपस्थित होते. विशेष एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर ही त्यांची पहिलीचं महापूजा होती.
शिंदे कुटुंबातील चार पिढ्यासोबत व सदस्यांसोबत त्यांनी विठुरायाची महापूजा केली. आजची महापूजा करण्यासाठी निवडणूक आयोगाने काही अटी आणि शर्तीच्या आधारावरती परवानगी दिली आहे.
पंढरपूरात दाखल झाल्यानंतर त्यांनी अनेक कार्यक्रमांना उपस्थिती लावली आहे. त्यानंतर त्यांनी महापूजा पहाटे महापूजा केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पांडूरंगाला साकडं
वारीत सहभागी झालेल्या भक्तांचे आभार मानतो. मला आज पुजा करण्याचा मला मान मिळाला. आमच्या चार पिढ्याने पुजा केली हे भाग्य सर्वांना मिळावं.
पूर येऊ नये पण बळीराजा सुखी राहू दे. बळीराज्याचे संकट दूर होऊ द्या, कोरोनाचा नायानाट होऊ द्या, असं साखडं पांडूरंगाला घातल आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मीडियाशी बोलताना सांगितलं.
समाज्यातील सर्व लोकांसाठी हे राज्य असेल. पंतप्रधानांनी सांगितले राज्यात मोठे प्रकल्प उभे करा. त्यासाठी निधी कमी पडणार नाही, आषाढी वारीचा आढावा घेतला लॉग टर्मसाठी सुधारणा व्हावी.
ह्यासाठी विशेष आराखडा तयार करण्याच्या सुचना दिल्या. कायमस्वरूपी विकास करण्याच्या सुचना दिल्या आहे असंही शिंदे यांनी सांगितलं.
काही जिल्ह्यात अतिवृषी झाली आहे. पूर परिस्थिती कंट्रोल करण्यासाठी मनुष्यबळ लागते. पावसाळ्यानंतर ह्या निवडणुका घ्या अशी विनंती करणार आहे. न्याय व्यवस्था हे ओबीसीला आरक्षण मिळणार आहे.
आम्ही राज्य स्थापन केले आहे. कायद्यानूसार आम्ही राज्य स्थापन केले आहे. हे सरकार हे कायदेशीर आहे. हे राज्य सर्वसामन्याचे राज्य आहे. सर्वांना न्याय मिळणार आहे. जागेवर काम होईल अशी आमची इच्छा आहे.
भाजपा नेत्यांची नाही तर संविधानिक पदावर असेल्या व्यक्तींची भेट घेतली. राज्याच्या विकासात केंद्रांची मदत होईल यासाठी दिल्लीत बैठक घेतली असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
आईवडिलांची पुण्याईने मला महापुजाचा मान मिळाला आहे
आजचा दिवस माझ्यासाठी सर्वांत महत्त्वाचा दिवस आहे. आईवडिलांची पुण्याईने मला महापुजाचा मान मिळाला आहे. सर्व सहकाऱ्यांचे मनापासून आभार मानतो.
10 लाखांपेक्षा जास्त वारकरी सहभागी झाले आहेत. राज्यातील जनेतला हे वर्ष सुखाचे जावे ही प्रर्थांना करतो असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.(स्रोत:TV9 मराठी)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज