टीम मंगळवेढा टाईम्स ।
भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या मंगळवेढा तालुकाध्यक्षपदी आशा अण्णासाहेब पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी तसे पत्र पाटील यांना दिले.

याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ आवताडे, जिल्हा सरचिटणीस संतोष मोगले, तालुकाध्यक्ष अंबादास कुलकर्णी, शहराध्यक्ष नागेश डोंगरे, पंचायत समितीचे माजी सभापती प्रदीप खांडेकर, सुधाकर मासाळ आदीजन मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आशा पाटील यांची भाजपच्या फायर ब्रँड नेत्या अशी ओळख आहे. त्यांनी महिला अन्याय, अत्याचार प्रकरणी अनेकदा आवाज उठवला आहे. विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यातही त्या आघाडीवर असतात.

भाजपाचे विचार घरा-घरात पोहचवणार
मंगळवेढा तालुकाध्यक्ष म्हणून काम करत आसताना महिला संघटन चांगल्या प्रकारे करून मोठी जबाबदारी पार पाडून बचतगटाच्या माध्यमातून महिलांसाठी वेगवेगळ्या योजना, कर्जपुरवठा मिळवून देणार आहे.

तसेच महिलांसाठी वेळोवेळी आवाज उठवून न्याय मिळवून देणार, भाजपाचे विचार घरा-घरात पोहचवण्यासाठी पुर्ण वेळ काम करणार असल्याचे तालुकाध्यक्ष आशा पाटील यांनी सांगितले.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज










