मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । पंढरपुरात रुग्णालयात उपचार घेणारी महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळली.याच रुग्णालयात मंगळवेढा तालुक्यातील जवळपास १२ रुग्णांनी उपचार घेतले,परंतु सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने मंगळवेढेकरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
मंगळवेढा शहर व तालुक्यात कोरोना संसर्गजन्य आजाराला अटकावासाठी मोठे प्रयत्न केले जात आहेत . पोलिसांच्या मदतीला पंचायत समिती , कृषी , बांधकामकडील कर्मचारी नियुक्त केले असून सध्या प्रशासन वेगाने कोरोनाशी लढा देत आहे.
रोगाच्या प्रादुर्भावाने तालुक्यात १० हजारांपेक्षा अधिक नागरिक या भागात आले. त्यांना रोगाचा प्रादुर्भाव आहे का नाही, त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली.
यात उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले , तहसीलदार स्वप्नील रावडे , उपविभागीय पोलिस अधिकारी दत्तात्रय पाटील , पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे , अधिकारी सुप्रिया चव्हाण , मुख्याधिकारी पल्लवी पाटील , तालुका आरोग्य अधिकारी नंदकुमार शिंदे , वैद्यकीय अधिकारी डॉ . प्रमोद शिंदे आदी अधिकारी सध्या कोरोनाविरुद्ध कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून लढा देत आहेत.
——————
ब्रेकिंग व नवनवीन ताज्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज