टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तालुक्यातील लमाणतांडा (बालाजीनगर) येथे लोकसभा निवडणूकीच्या माध्यमातून गावभेट दौऱ्यावर बालाजी नगर येथे प्रणिती शिंदे आले असता त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले व सभा ही मोठी झाली,
सभेला गर्दी गावकऱ्यांनी मोठी केली होती यावेळी गावातील पुढारी एका बाजूला व गावातील नागरीक एका बाजूला असे चित्र प्रणिती शिंदे यांनी बघितले.
कारण पुढारी कोणीच नव्हते मी सगळे गावातील युवक व नागरिक एका बाजूला केले होते परवा बालाजी नगर येथील अतिक्रमणाचा मुद्दा गाजलेला मंगळवेढा तालुक्याने बघितला होता गावातील नागरिक एकत्र झाले होते.
यावेळी गावातील पुढारी या त्या अतिक्रमण धारकाच्या पाठीमागे गेले असल्यामुळे याचा फटका भाजपाला बसणार आहे त्यामुळे गावातील सगळे लोक पुढाऱ्याच्या विरोधात तयार झाले आहेत असे संजय राठोड म्हणाले.
यावेळी उपोषणात गावातील झालेला युवकांना त्रास आमदार प्रणिती शिंदे यांना सांगितला आता यापुढे गावातील मताधिक्य प्रणिती शिंदे यांना देणार आहे जीवाचे रान करू व प्रणिती शिंदे यांना निवडून आणू असा निश्चय आम्ही केलेला आहे.
त्यामुळे कुणाची ताकद किती आहे हे मंगळवेढा तालुक्यातील पुढाऱ्यांना सिद्ध करून दाखवतो आम्हाला कमी समजणर्याची अवकात येणाऱ्या निवडणुकीत मतदानाच्या रूपात दाखवू कारण बालाजी नगर येथे ग्रामपंचायत च्या योजना ह्या स्वतःच्या घरी नेल्या आहेत.
पिण्याच्या पाण्याची सोय नाही ,खेळाची मैदाने, जिम ,व्यायाम शाळा, सांस्कृतिक भवन घरात नेली या विरोधात आम्ही आवाज उठवला आहे लवकरच ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावकऱ्यांना न्याय मिळवून देऊ असा विश्वास आम्ही गावकऱ्यांसमोर ठेवलेला आहे.
त्यामुळे गावकऱ्यांनी आमदार प्रणिती शिंदे यांना खासदार करू त्यांना खासदार करण्याची गरज आहे असे ठरवले आहे त्यामुळे बालाजी नगर मधून मोठे मताधिक्य देऊन त्यांच्या पाठीशी गावातील युवक, जेष्ठ नागरिक, महिला व बंजारा समाज हक्काने उभा करू असे संजय राठोड यांनी सांगितले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज