मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक सरताच आणि निवडणूक निकाल लागताच गृह विभागाने मोठा निर्णय घेतलेला आहे. ज्यांच्या जीवाला धोका नाही, अशा नेत्यांच्या सुरक्षतेत कपात करण्याचे गृह विभागाने ठरवले आहे.
विशेष म्हणजे शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांची सुरक्षा कमी करण्याचा निर्णय गृह विभागाने घेतल्याने यावरून नाराजीनाट्य रंगण्याची अधिक शक्यता आहे.
भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या काही नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय गृहमंत्रालयाने घेतलेला आहे. व्हीआयपी व्यक्तींच्या सुरक्षेचा आढावा घेतल्यावर गृह विभागाने निर्णय घेतल्याचे कळते.
कुणाकुणाची सुरक्षा काढली?
ज्यांच्या जीवाला धोका नाही, अशा नेत्यांच्या सुरक्षतेत कपात केली जाणार आहे. त्यानुसार भाजपचे कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण, प्रतापराव चिखलीकरांसह विविध नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात येणार आहे.
गरज नसताना सुरक्षेचा लवाजमा घेऊन मिरवणाऱ्यांची सुरक्षा काढण्याचा निर्णय
शिवसेनेचे मंत्री वगळता आमदारांना दिलेली सुरक्षाही कमी केली जाणार आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत बाहेर पडलेल्या शिवसेनेच्या सर्व आमदारांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्याक आलेली होती.
तत्कालिन परिस्थिती लक्षात घेऊन आमदारांना सुरक्षा पुरविण्यात आलेली होती. मात्र आता गरज नसताना सुरक्षेचा लवाजमा घेऊन मिरवणाऱ्यांची सुरक्षा काढून घेतली जाणार आहे.
आधीच पालकमंत्रिपदावरून सुंदोपसुंदी, त्यात आता सुरक्षा कमी करण्याचा निर्णय, शिंदे गटात संताप
महायुती सरकारला तीन महिने पूर्ण होत आली आहेत, पण सरकारमध्ये सहभागी असलेल्या पक्षांची अंतर्गत नाराजी मोठ्या प्रमाणावर आहे.
तिन्ही पक्षांमध्ये पालकमंत्रिपदावरून सुंदोपसुंदी सुरू आहे. पालकमंत्रिपदाचा विषय मार्गी लागलेला नसताना आता शिवसेना आमदारांची सुरक्षा कमी करण्याचा निर्णय घेतल्याने शिंदे गटातील आमदारांमध्ये संतापाचे वातावरण असल्याचे कळते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज