टीम मंगळवेढा टाईम्स।
शेतरस्त्याच्या वादातून झालेल्या भांडणाच्या रागातून पाच जणांनी दोघांवर तलवार व कुऱ्हाडीने हल्ला केला. यात ते जखमी झाले.
सायंकाळी सातच्या सुमारास महमदाबाद ( शेटफळ ) येथे ही घटना घडली. याप्रकरणी त्या पाच जणांविरुद्ध येथील पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.
त्यापैकी चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. तुकाराम लवटे , समाधान माने अशी जखमींची नावे आहेत.
अभिजित जकाप्पा माने, तात्यासाहेब जकाप्पा माने, जकाप्पा लक्ष्मण माने (महमदाबाद, ता. मंगळवेढा) मोहन बिरा चोरमले, सोमा बिरा चोरमले ( रा . तपकिरी शेटफळ , ता . पंढरपूर ) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.
मोहन वगळता इतर चार जण अटकेत आहेत. यातील फिर्यादी तुकाराम लवटे (वय २८, रा . सावे ,ता . सांगोला ) हे मावसभाऊ समाधान माने यांच्या महमदाबाद येथील शेतात पांडुरंग मेटकरी, आप्पासाहेब मासाळ यांच्यासोबत शेतात बसले होते.
तेव्हा संशयित हे शस्त्रांसह तेथे आले. त्यांनी तुम्ही इथे का बसला आहात, अशी विचारणा करत सर्वांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.
अभिजित याने समाधान यांना तुला जिवंतच ठेवत नाही, असे म्हणत तलवारीने त्यांच्या डोक्यावर हल्ला केला. तुकाराम हे सोडविण्यास गेल्यावर मोहन याने कुऱ्हाड उलटी धरून मारल्याने ते जखमी झाले.
तात्यासाहेब , सोमा , जकाप्पा यांनी पांडुरंग , अप्पासाहेब यांना हाताने , लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
भादंवि कलम ३०७ , ३२४ , ३२३ , १४३ , १४७ , १४८ , १४ ९ , ५०४ , ५०६ शस्त्रास्त्र अधिनियम १ ९ ५ ९ चा कलम ४ व २५ , महाराष्ट्र पोलिस अधिनियम १३५ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
समाधान माने यांच्यावर सोलापूर येथील खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. पोलिस उपनिरीक्षक सौरभ शेटे तपास करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज