मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
देशातील वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी शिवसेनेकडून खासगी विधेयक सादर करण्यात आले आहे. शिवसेना राज्यसभा खासदार अनिल देसाई यांनी खासगी विधेयक सादर करताना दोन अपत्य असणाऱ्यांनाच शासकीय सवलतींचा लाभ मिळावा असा प्रस्ताव दिला आहे. देसाई यांनी राज्यसभेत विधेयक सादर केले.
भारतीय राज्यघटनेतील कलम 47 अ मध्ये बदल करण्यासाठी सुधारित विधेयकाचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. वाढणारी लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी देशात छोट्या कुटुंबांना प्रोत्साहन मिळायला हवे. अपत्य संख्या दोनपर्यंत मर्यादित ठेवणाऱ्या कुटुंबांना कर, रोजगार, शिक्षण क्षेत्रात सवलती मिळाव्यात.
‘छोट्या कुटुंबाचे’ पालन न करणाऱ्या कुटुंबांना अशा सवलतींपासून दूर ठेवण्यात यावे असे विधेयकात नमूद करण्यात आले आहे.
दोनपेक्षा अधिक मुलांना जन्म देण्यापासून परावृत्त करण्यासाठी, सवलती नाकारणे, अधिक कर आणि इतर दंडात्मक तरतुदी करुन उपाययोजना कराव्यात, असा सल्ला अनिल देसाई यांनी विधेयकातून दिला आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज