टीम मंगळवेढा टाईम्स ।
यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये देशात 97 कोटीहून अधिक मतदार आहेत. त्यात 49.7 कोटी पुरुष आणि 47.1 कोटी महिला मतदारांचा समावेश आहे. तसेच 1.82 कोटी नवीन मतदार आहेत. यंदा 82 लाख प्रौढ मतदार मतदान करणार आहेत.
48 हजार तृतीयपंथीयही मतदान करणार असल्याची माहिती दिली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेमध्ये देशात पहिल्यांदाच घरोघरी मतदानाची सोय केल्याची घोषणा केली आहे.
या लोकांचं घरोघरी जाऊन होणार मतदान
मतदारांमध्ये यंदा 82 लाख मतदार हे 85 वर्षांपेक्षा जास्त आहेत. त्यामुळे ज्यांना पोलिंग बुथवर येऊ न शकणाऱ्यांसाठी घरोघरी जाऊन मतदान करून घेण्याची सोय करण्यात आली आहे. दिव्यांग मतदारांसाठी व्हिलचेअरची सुविधा उपलब्ध असणार आहे.
जास्तीत जास्त आणि प्रत्येकाने मतदान करावं यासाठी आम्ही ही मेहनत घेत आहोत. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या घराजवळ असणाऱ्या पोलिंग बुधवर मतदान करावं, असं राजीव कुमार यांनी सांगितलं आहे. यासाठी एक फॉर्म देण्यात येणार आहे तो भरावा लागणार आहे.
आमच्या टीममधील प्रत्येकाला ट्रेनिंद देण्यात आलं आहे. जंगल, बर्फ, नदी ते घोड्याने, हत्तीवर किंला हेलिकॉप्टरने ते सर्वत्र जाणार आहेत. कारण प्रत्येकाला मतदान करता यावं, यासाठी आम्ही पूर्म तयारी केल्याचं राजीव कुमार म्हणाले.
ही निवडणूक म्हणजे आमच्यासाठी ऐतिहासिक संधी असणार आहे. देशातील निवडणूक म्हणजे 1 सण असतो, जगाचं लक्ष या निवडणुकीकडे आहे. 17 व्या लोकसभेची मुदत संपत आहे. प्रत्येक मतदान म्हणजे आमची चाचणी असते. आम्ही जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी राजकिय पक्ष यांच्याशी संवाद साधला आहे, ही निवडणूक निःपक्ष पणे होईल, असं राजीव कुमार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, 2019 च्या लोकसभा निवडणुका 11 एप्रिल ते 19 मे दरम्यान 7 टप्प्यात पार पडल्या होत्या. तर 23 मे रोजी निकाल लागला होता. 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीच्या तारखा 5 मार्च रोजी जाहीर झाल्या होत्या. 7 एप्रिल ते 12 मे या कालावधीत 9 टप्प्यांत निवडणुका झाल्या होत्या.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज