टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा वकिल संघाचे सदस्य असलेल्या तब्बल १७ विधीज्ञांची भारत सरकारच्या पब्लिक नोटरीपदी नियुक्ती झाली आहे. यामध्ये ॲड.महादेव गायकवाड, ॲड.इरफान सय्यद, ॲड.बाळासाहेब यादव, ॲड. शिवाजी पाटील, ॲड. धनंजय हजारे, ॲड.बी. एल. पवार, ॲड. श्रीशैल्य हावनाळे,
ॲड. राजू कुलकर्णी, ॲड. विष्णूपंत बेदरे, ॲड. राजू बामणे, ॲड.गुरुराज बुरकूल, ॲड. दत्तात्रय तोडकरी, ॲड. राजू शेख, ॲड. रविकिरण कोळेकर, ॲड. रावसाहेब रणे,
ॲड. जावेद मुल्ला, ॲड. दत्तात्रय माने यांची निवड झाली असून याबद्दल मंगळवेढा वकिल संघाचे अध्यक्ष ॲड.उल्हास माने व इतर विधीज्ञांनी या सर्वांचे अभिनंदन केले आहे.
नागरिकांसाठी मतदार मदत कक्ष स्थापन ०२१८६-२९९०९९ या क्रमांकावर मिळणार सुविधा
नागरिकांना निवडणूविषयक माहिती आणि तक्रारींचे निवारण करण्यासाठी ४२ सोलापूर (अ.जा.) लोकसभा मतदार संघातर्गंत २५२ पंढरपूर विधानसभा मतदार संघामध्ये सांस्कृतिक भवन, उपविभागीय अधिकारी कार्यालय, पंढरपूर येथे मतदार मदत कक्ष सुरु करण्यात आला आहे.
सदर मतदार मदत कक्षाचा दुरध्वनी क्रमांक ०२१८६-२९९०९९ असून हा मदत कक्ष चोवीस तास सुरु राहणार असल्याचीमाहिती प्रांताधिकारी तथा सहा. निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे यांनी दिली.
सदर मतदार मदत कक्षातील हेल्पलाईन क्रमांकावर मतदार यादीतील नाव शोधणे, मतदार यादीतील अनुक्रमांक आदीबाबत आवश्यक असलेली माहिती तात्काळ देण्यात येणार असून, नागरिकांनी या उपलब्ध सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रांताधिकारी तथा सहा. निवडणूक निर्णय अधिकारी इथापे यांनी केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज