टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यात जानेवारी 2023 मध्ये मुदत संपणाऱ्या 15 ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून विस्तार अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी नियुक्तीचे आदेश दिले आहेत.
गेले दोन वर्ष कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शासनाने निवडणुकीचा कार्यक्रम पुढे ढकलला याचे परिणाम जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपालिका व मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या कारभारावर झाले.
या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका यापूर्वीच पुढे ढकलेल्या आहेत गत महिन्यात तालुक्यामध्ये 18 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या टप्पा पार पडला.
तालुक्यामध्ये सध्या जानेवारी अखेरपर्यंत 15 ग्रामपंचायतीची मुदत संपणार आहे तर फेब्रुवारी महिन्यात आणखी 4 ग्रामपंचायतची मुदत संपणार आहे.
मात्र राज्य निवडणूक आयोगाने तालुक्यातील 27 ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचना करण्याचे आदेश नुकते दिले आहे त्यामुळे ही प्रभाग रचनेची प्रक्रिया पूर्ण होण्यास जवळपास एप्रिल अखेर लागेल त्यानंतर निवडणुकीची प्रक्रिया होणार आहे.
त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात मुदत संपणार्या ग्रामपंचायतीचा पदभार हा प्रशासकाच्या हाती सोपवलेला आहे.
वास्तविक पाहता ग्रामपंचायतीचे वर नियुक्त केलेले प्रशासक हे पंचायत समितीच्या आरोग्य,शिक्षण,पंचायत, कृषी, सांख्यिकी या विभागाच्या कृषी अधिकाऱ्याला या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामध्ये त्यांच्यावर दोन ते तीन ग्रामपंचायतीची जबाबदारी सोपवण्यात आली.
वास्तविक पाहता त्यांना त्यांचे नियमित कामकाज करून या ग्रामपंचायतीच्या कारभारावर लक्ष ठेवताना या ग्रामपंचायतीच्या अंतर्गत असलेल्या नागरिकांच्या तक्रारी व सोयी सुविधावर देखील लक्ष देण्याची मोठी जबाबदारी येऊन पडली आहे.
गावनिहाय नियुक्त प्रशासक पुढीलप्रमाणे
शिरसी व खुपसंगी राहुल मिसाळ कृषी विस्ताराधिकारी,अकोला व निंबोणी हरिदास नरळे (विस्तार अधिकारी पंचायत), जंगलगी पोपट लवटे (विस्ताराधिकारी शिक्षण), खडकी व जुनोनी मधुकिरण डोरले (कृषीविस्ताराधिकारी),
महमदाबाद (हु) श्रीनिवास शेरला (विस्ताराधिकारी सांख्यिकी), बठाण, उचेठाण, ब्रम्हपुरी, ज्ञानेश्वर साळुंखे (विस्ताराधिकारी पंचायत), शेलेवाडी बिबीषण रणदिवे (विस्ताराधिकारी शिक्षण),
मुंढेवाडी बाळासाहेब बाबर (कृषीधिकारी), जालिहाळ ब्रह्मदेव माने (विस्ताराधिकारी आरोग्य), यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील महिन्यात हिवरगाव, नंदुर, भाळवणी, चिखलगी या चार ग्रामपंचायतीची मुदत संपणार आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज