टीम मंगळवेढा टाईम्स ।
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या संकुलात तसेच संलग्न काही महाविद्यालयांमध्ये विविध पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता प्रवेश घेण्यासाठी प्रवेशपूर्व परीक्षेचे नियोजन करण्यात आले.
यासाठी २६ मे २०२४ पर्यंत विद्यापीठाच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज करता येणार आहे, अशी माहिती प्र-कलगुरु प्रा.लक्ष्मीकांत दामा व परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.श्रीकांत अंधारे यांनी दिली.
पदार्थविज्ञान संकुलाच्या एमएस्सी फिजिक्स-अप्लाईड इलेक्ट्रॉनिक्स, मटेरियल सायन्स, कंडेन्सड मॅटर फिजिक्स, एनर्जी स्टडी, सॉलिड स्टेट व नॅनो फिजिक्स, एमएस्सी इलेक्ट्रॉनिक सायन्स, इलेक्ट्रॉनिक अंड इलेक्ट्रॉनिक्स इंटरनेट ऑफ थिंग्स अभ्यासक्रमासाठी प्रवेशपूर्व परीक्षा होणार आहे.
विद्यापीठ संकुलातील एमएस्सी मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी आणि बायोइन्फॉर्मेटिक्स या अभ्यासक्रमांसाठी ही पूर्व परीक्षा होणार आहे. एमएस्सी केमिस्ट्रीच्या पॉलिमर, ऑरगॅनिक, इंडस्ट्रियल, मेडिसिनल केमिस्ट्री, इनऑरगॅनिक, फिजिकल,
एनालिटिकल, फार्मास्युटिकल एमएस्सी इन्व्हरमेंटल सायन्स, एमएस्सी कम्प्युटर सायन्स मॅथेमॅटिक्स, एमएस्सी स्टॅटिस्टिकस, एमएस्सी बायोस्टॅटिस्टिकस, एम.ए.मास कम्युनिकेशन, एमएससी बॉटनी, झूलॉजी, एमएस्सी ॲग्रोकेमिकल अँड पेस्ट मॅनेजमेंट, इंटरप्रिनरशिप या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी प्रवेशपूर्व परीक्षा होणार आहे.
एमएस्सी जिओलॉजी, जिओइन्फॉर्मेटिक्स, एम.ए. प्राचीन भारतीय इतिहास आणि पुरातत्वशास्त्र, ग्रामीण विकास, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, मानसशास्त्र आणि इतिहास, पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशन, एम.ए. मराठी, हिंदी, इंग्लिश, संस्कृत, उर्दू, पाली, प्राकृत
आणि कन्नड, एम.ए. संगीत, नाटक, तबला व पखवाज आणि व्हिज्युअल आर्टस्, एम. कॉम. अॅडव्हान्स अकाउंटन्सी, अॅडव्हान्स बँकिंग आणि एमबीए, बीव्होक पत्रकरिता व जनसंज्ञापन,
अॅडव्हान्स पी.जी. डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक मीडिया, पी. जी. डिप्लोमा इन म्युझिकोलॉजी, एमटेक कोर्स इन कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी, पी.जी. डिप्लोमा इन डायटिक्स अँड न्यूट्रिशन आणि एम.ए. योगा या अभ्यासक्रमांसाठी विद्यापीठाच्या अधिविभागांमध्ये थेट प्रवेश देण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज