टीम मंगळवेढा टाईम्स।
माजी मंत्री प्रा लक्ष्मण ढोबळे यांच्या धर्मपत्नी स्व.अनुराधा ढोबळे यांच्या जयंतीनिमित्त मंगळवार दि.२९ नोव्हेंबर रोजी
शाहू शिक्षण संस्था व सावली फाउंडेशन आणि बहुजन रयत परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसंध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार ह.भ.प.चैतन्य महाराज वाडेकर आळंदीकर यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महात्मा फुले सूतगिरणीचे चेअरमन अभिजीत ढोबळे यांनी दिली.
कीर्तनाचा कार्यक्रम शाहू मैदान शिशुविहार समोर मंगळवेढा येथे आयोजिला असून सायंकाळी सहा वाजता कीर्तन सुरू होणार आहे.
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, खासदार डॉ.जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते आणि माजी मंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रमुख उपस्थित हा कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात येणार आहे.
याच कार्यक्रमात मंगळवेढ्याच्या माजी नगराध्यक्ष अरुणा माळी व डीवायएसपी राजश्री पाटील यांच्या हस्ते ४१ महाराजांचा सत्कार करण्यात येणार आहे.
अलौकिक प्रतिभेचे देणे लाभलेल्या व अध्यात्मिक शक्तीचे निरूपण कार असलेल्या कीर्तनकार चैतन्य महाराज वाडेकर यांच्या कीर्तनाचा तसेच देवभूमीवरील प्रसाद घेण्यासाठी
सोलापूर जिल्ह्यातील तमाम कीर्तन प्रेमींनी उपस्थित रहावे असे आवाहन शाहू शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अब्राहम आवळे, विश्वस्त क्रांती आवळे, विश्वस्त कोमल साळुंखे, अजय साळुंखे यांनी केले आहे.
ढोबळे सर असं का बोलले?
राज्याचे माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे सर कुठे काय बोलतील, याचा नेम नाही. त्यांच्या बोलण्याचा अर्थ लवकर लागत नाही, असे त्यांचे कार्यकर्ते सांगतात.
ते गुरुवारी दुपारी शासकीय विश्रामगृहात आले होते. यादरम्यान महापालिकेच्या नव्या आयुक्त शीतल उगले विश्रामगृहात आल्या होत्या. आपले संपवून आयुक्त उगले निघाल्या.
त्यावेळी बाहेरच ढोबळे सर थांबले होते. आयुक्तांना त्यांनी नमस्कार केला. आपण माजी मंत्री आहोत, असे आवर्जून सांगितले.
देवेद्र फडणवीस मलाही ओळखतात. मी त्यांना दुरूनच भेटतो, असे ढोबळे म्हणाले.
जाताना शेजारीच असलेल्या पत्रकाराच्या खांद्यावर हात ठेवला. बरोबर बोललो ना मी?, असा सवाल केला? पण ढोबळे असे का बोलले? याची कुजबुज विश्रामगृहाच्या आवारात अनेक वेळ सुरु होती.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज