टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहरातील समाधान खंदारे (वय 32) व जित्ती येथील सिताराम भोसले (वय 20) या दोघा तरूणांनी गळफास घेवून
आत्महत्या केली असल्याची घटना घडली असून या घटनेची मंगळवेढा पोलिसात अकस्मात मयत अशी नोंद झालेली आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, पहिल्या घटनेत शहरातील साठे नगर येथील समाधान खंदारे याने दि.24 रोजी सकाळी 9.45 च्या दरम्यान एम.आय. डी. सी. परिसरात वायसन्स इंडस्ट्रीजच्या बाजूला रोडच्या कडेला
जंगली झाडाला सुताच्या दोरीने अज्ञात कारणावरून गळफास घेवून आत्महत्या केली. दरम्यान पोलिसांनी त्यांचा व्हिसेरा राखून ठेवला आहे.
दुसर्या घटनेत जित्ती येथील सिताराम भोसले याने दि.24 रोजी सकाळी 11.00 वा.राहते घरामध्ये पत्र्याच्या अँगलला दारूच्या नशेत लुंगीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली आहे.
पोलिसांनी याचाही व्हिसेरा राखून ठेवला आहे. दरम्यान एकाच दिवशी दोन तरूणांनी आत्महत्या केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
सोलापुरातून कॉलेजला गेलेली युवती परत आलीच नाही ; अपहरणाची तक्रार ; 27 वर्षीय महिलाही झाली बेपत्ता
सोलापूर शहराच्या अनेक भागातून मागील काही महिन्यांपासून कॉलेजला जाणाऱ्या मुली, घरातील विवाहिता बेपत्ता होण्याची प्रकार वाढले आहेत. त्यामध्ये वीस वर्षाखालील मुली व विवाहिता सर्वाधिक बेपत्ता झाल्याचं दिसून आलं आहे.
दरम्यान कर्णिक नगर भागातील सतरा वर्षाची कॉलेज तरुणी वालचंद कॉलेजला शिकत होती. 15 नोव्हेंबर 2022 रोजी कॉलेजला जाते म्हणून गेली ती परत आलीच नाही.
स्वामीनी रवींद्र भग्रे असे त्या मुलीचे नाव असून कुटुंबियांनी तब्बल दहा दिवस तिचा शोध घेतला मात्र ती मिळून आली नाही.
शेवटी मुलीची आई मुद्रिका भगरे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात मुलीला कोणीतरी फूस लावून पळून नेल्याची तक्रार दाखल केली आहे.
तसेच मुळगाव रोडवरील राघवेंद्र नगरातील वैष्णवी मंदिर जवळ राहणाऱ्या श्रीदेवी शिवपुत्र बिराजदार वय 28 ही महिला 23 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी नऊ वाजता कामाला जाते म्हणून घरातून निघून गेली ती आलीच नाही.
दोन दिवस तिची चौकशी केली असता ती मिळून आली नसल्याने नातेवाईकांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे.
वरीलपैकी मुलगी व महिना कुणाला दिसल्यास त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाणे 0217 2744690 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज