mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना वार्षिक वेतनवाढ ; आर्थिक अडचणीतही राज्य शासनाचा निर्णय

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना वार्षिक वेतनवाढ ; आर्थिक अडचणीतही राज्य शासनाचा निर्णय

मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । राज्य सरकारने गुरुवारी शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वार्षिक वेतनवाढ जाहीर केली. करोना साथरोगामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे. अशा स्थितीतही राज्य शासनाने वेतनवाढीचा निर्णय घेतला आहे. Annual pay hike for state government employees

मात्र ३० जूनपर्यंत जे अधिकारी व कर्मचारी सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी वैद्यकीय प्रमाणपत्रांशिवाय रजेवर असतील, त्यांना वेतनवाढीचा लाभ मिळणार नाही, असे वित्त विभागाने जारी केलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

करोना साथरोगाचा मुकाबला करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे राज्याची आर्थिक व्यवस्था पार कोलमडलेली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचे पूर्ण वेतनही देता आले नाही. त्याचबरोबर जुलैमध्ये देय असलेला सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा दुसरा हप्ताही देणे एक वर्ष लांबणीवर टाकण्यात आला आहे. अशा परिस्थतीत दरवर्षी जुलैमध्ये जाहीर केली जाणारी वार्षिक वेतनवाढ मिळणार की नाही, याबाबत कर्मचाऱ्यांमध्ये साशंकता होती, ती या निर्णयामुळे दूर झाली आहे. मूळ वेतनावर साधारणत: तीन टक्के वार्षिक वेतनवाढ दिली जाते. राज्यातील सुमारे १९ लाख अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ मिळेल.

करोना साथरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासकीय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती नियंत्रित करण्यात आली आहे. वार्षिक वेतनवाढ मिळण्यासाठी ३० जूनपर्यंत सहा महिने कर्मचाऱ्यांची सेवा अनिवार्य मानली जाते. मात्र टाळेबंदीच्या काळात शासनाच्या आदेशानुसार जे कर्मचारी प्रत्यक्ष कार्यालयात उपस्थित राहून काम करीत आहेत आणि जे कर्मचारी घरातून शासकीय कामकाज पार पाडत आहेत व ज्यांचा १ जुलै रोजी सेवेचा कालावधी सहा महिने पूर्ण झाला आहे, त्यांना वार्षिक वेतनवाढ मिळणार आहे.

यांना लाभ नाही

टाळेबंदीच्या काळात जे अधिकारी व कर्मचारी कामावर हजर राहिलेले नाहीत, मात्र त्यांनी अर्धवेतनी, अर्जित किंवा विनावेतन रजेसाठी अर्ज सादर केले आहेत, त्यांना वेतनी रजा मंजूर करणे शक्य असल्यास, तसेच त्यांची ३० जूनपर्यंत सहा महिने सेवा पर्ण होत असल्यास, त्यांना वेतनवाढ देण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. मात्र १ जुलै २०१९ पासून ते ३० जून २०२० पर्यंत सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधीसाठी वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय रजेवर असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना वार्षिक वेतनवाढ मिळणार नाही, असे वित्त विभागाने स्पष्ट केले आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Maharashtra MazaRecent NewsSolapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
महिला वकील आत्महत्ये प्रकरणी पतीसह सासरच्या चौघांवर गुन्हा दाखल

महिला वकील आत्महत्ये प्रकरणी पतीसह सासरच्या चौघांवर गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मंगळवेढा नगरपालिकेत ‘जनता दरबार’ भरवा; ‘एक दिवस गावासाठी’ अभियानाची आग्रही मागणी; ​प्रशासकीय पारदर्शकता आणि शहर विकासासाठी नागरिकांचे थेट साकडे

May 11, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

शेत मोजणीचा साडेसाती सुटणार! आता ‘इतक्या’ दिवसांत मोजणी अन् ३ दिवसांत फाईल निकाली; महसूलमंत्री बावनकुळेंचे आदेश

May 11, 2026

कामाची बातमी! राज्यातील देवस्थान इनाम जमिनींबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय

May 11, 2026
मोठी बातमी! केंद्र सरकारचा ऊस उप्तादक शेतकऱ्यांना दिलासा, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय

नागरिकांनो! पुढील वर्षभर सोनं खरेदी करू नका, पेट्रोल डिझेल जपून वापरा, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले जनतेला आवाहनं, कारण काय?

May 11, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

संतापजनक! शेतीच्या कारणावरून मुलाचा वडिलांवर चाकूने हल्ला; वडिलांची मुलाविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार

May 10, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

गावात पाणी नाही, मजुरांना पैसे नाही! ग्रामपंचायतींचा आर्थिक कारभार ठप्प; कोर्टाच्या आदेशामुळे सरपंच अडचणीत; ग्रामीण भागात संतापाचा उद्रेक

May 10, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा