टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील सिद्धापूर येथील नदीपात्रातील स्वयंभू मातृलिंग गणपती भाविकांना दर्शनासाठी खुला करण्यात आल्या असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष भीमगोंडा पाटील यांनी दिली आहे.
मंगळवेढा तालुक्यातील व परिसरातील भाविक भक्तांना आज अंगारकी चतुर्थी निमित्ताने स्वयंभू मातृलिंग गणपतीचे दर्शन होण्यासाठी ट्रस्टच्या वतीने रॅम्प तयार करण्यात आला आहे.
दर्शनासाठी आलेल्या भाविकांना आता कसलीच अडचण येणार नाही स्वयंभू गणपतीचे दर्शन व्यवस्थित होत असल्यामुळे पहाटेपासूनच नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे.
सिद्धापूर फेस्टिवलचे पुरस्कार जाहीर, अनेक मान्यवरांच्या कामाची घेतली दखल; विविध कार्यक्रमाचे देखील आयोजन; गजानन पाटील यांची माहिती
मंगळवेढा तालुक्यातील सिद्धापूर येथे सालाबाद प्रमाणे कै.रामगोंडा बापूराव चौगुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त याही वर्षी सिद्धापूर फेस्टिवल दि.7 जानेवारी ते 13 जानेवारी पर्यंत विविध कार्यक्रमाने आयोजित करण्यात आल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष गजानन पाटील सर यांनी दिली आहे.
आज मंगळवार दि.10 जानेवारी रोजी शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप कार्यक्रम पार पडणार असून यावेळी उद्घाटक म्हणून ग्रामपंचायतीचे सदस्य सचिन बापूराया चौगुले उपस्थित राहणार आहेत.
शुक्रवार दि.13 रोजी सायंकाळी सहा वाजता वार्षिक स्नेहसंमेलन व विविध पुरस्कार वितरण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडेल, याप्रसंगी उद्घाटक म्हणून तालुक्याचे जनतेचे आमदार समाधान आवताडे,
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचे युवा नेते प्रणव परिचारक, मंगळवेढा पंचायत समितीचे माजी सभापती प्रदीप खांडेकर यांच्यासह विविध संस्थेचे पदाधिकारी, विविध पक्षाचे पदाधिकारी, मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
याप्रसंगी सोलापूर जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्याबद्दल प्रोत्साहन पर पुरस्कार रूपाने पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे, साहित्य क्षेत्रातील शब्दांकुर पुरस्कार म्हणून सुनील जंवजाळ, कृषी क्षेत्रातील प्रगतशील शेती बाबत उघडेवाडी तालुका माळशिरस येथील शेतकरी बळीवंश पुरस्कार म्हणून बाबुराव यशवंत सादी
तसेच शिक्षण क्षेत्रातून अक्कलकोट तालुक्यातील नागणसूर येथील आदर्श शिक्षक पुरस्कार म्हणून प्रशांत नागुरे,स्वच्छ शाळा सुंदर शाळा ज्ञानगण पुरस्कार म्हणून दक्षिण सोलापूर तालुक्याचे दर्गनळी येथील आदर्शवत प्रशाला म्हणून लक्कम्मादेवी प्रशाला,
मंगळवेढा तालुक्यातून पत्रकार क्षेत्रातून जनमित्र पुरस्कार म्हणून ज्ञानेश्वर भगरे, सामाजिक क्षेत्रातील आदर्शवत कार्य म्हणून मरवडे येथील राज्यभर प्रसिद्ध असलेल्या छत्रपती परिवाराचा सन्मान,राजकीय क्षेत्रात राजकीय चेहरा म्हणून संजय तेली, शैक्षणिक क्षेत्रातून आदर्श पालक तांडोर गावतील माता श्रीमती कमलाबाई भोसले,
पशु वैद्यकीय सेवेतून आदर्शवत कार्य असलेले पशुसेवा पुरस्काराचे मानकरी डॉक्टर ब्रह्मानंद कदम यांचा पुरस्कार रूपाने सन्मान सोहळा पार पडणार आहे,
याप्रसंगी तालुक्यातील सर्व क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. सिद्धापूर फेस्टिवल माध्यमातून समाज प्रबोधन व सामाजिक कार्यासाठी सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहवे असे आव्हान आरबीसी परिवाराचे मार्गदर्शक बापूराव चौगुले व गजानन पाटील सर यांनी केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज