टीम मंगळवेढा टाईम्स।
लोकसभा निवडणुकीसाठी अक्कलकोट येथे बालविकास प्रकल्प विभागातून सुपरवायझर यांना आदेश आहेत. मात्र त्याठिकाणी न जाता विनापरवाना सेविकांना पाठवले जाते. यामुळे एकच गोंधळ उडाला आहे.
चार सुपरवायझर यांना निवडणूक कामासाठी आदेश देण्यात आले आहे. तरी मागील पाच दिवसापासून त्या न जाता त्याठिकाणी सेविकांना पाठवण्यात येत आहे.
बेकायदेशीरपणे कोणीही कोणाच्या जागी पाठवत असतील तर योग्य नाही. अशी चर्चा सुरू झाली आहे. सेविका गणवेशात आल्यामुळे सदर बाब तहसीलदारांच्या लक्षात आली. तेव्हा त्यांनी तात्काळ जाब विचारला असता, तेव्हा सर्वांचे बोबडी वळली होती.
नाव नसताना कसे काय सेविका ड्युटीवर गेल्या अशी चर्चा तहसील कार्यालयात सुरू आहे. तुटपुंज्या मानधनवर काम करणाऱ्या सेविकांना रोज शंभर रुपये खर्च करून शहराबाहेर असलेल्या कार्यालयात ये-जा करावी लागत आहे.
सध्या सेविकांना जन्म, मृत्यू, नोंदी, अल्पसंख्याक गणना, कुटुंब क्रमांक सव्र्व्हेक्षण, घरावर क्रमांक टाकणे, स्थलांतरीत कुटुंबाचे नोंदी करणे असे अनेक कामे सुरू आहेत. निवडणूक कामामुळे याकडे दुर्लक्ष होत आहे.(स्रोत:पुण्यनगरी)
मार्च एन्डमुळे सदर निवडणूक कामासाठी सेविकाना पाठवले जात आहे. सुपरवायझर यांचे कामे मार्गी लागताच पुन्हा त्याच जातील. सुवर्णा जाधव, बालविकास प्रकल्प अधिकारी
माझ्याकडे सदर विषयाचे लेखी तक्रार अद्याप आलेली नाही. तक्रार येताच संबंधित अधिकाऱ्यांना लेखी विचारणा करू.- सुर्यमणी गायकवाड, जिल्हाध्यक्ष अंगणवाडी संघटना
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज