टीम मंगळवेढा टाईम्स।
संत दामाजी सहकारी साखर कारखान्याकडे हंगाम २०२२-२३ मध्ये गळीतास आलेल्या ऊसाचे दि.१६ डिसेंबर २०२२ ते ३१ डिसेंबर २०२२ अखेर कालावधीचे
अॅडव्हान्स ऊसबिल २ हजार ३०० रूपयाप्रमाणे सभासद शेतकऱ्यांच्या – संबंधीत बँका, पतसंस्थेमध्ये वर्ग केले असल्याची माहिती चेअरमन शिवानंद पाटील यांनी दिली.
कारखान्याचे व्हाईस चेअरमन तानाजी खरात, संचालक मंडळातील सर्व सहकारी, शेतकरी सभासद, ऊस तोडणी वाहतूक ठेकेदार, कारखान्याचे अधिकारी व कामगाराच्या सहकार्याने
आजअखेर ९५ दिवसात ३, २८, २९० मे. टन ऊसाचे गाळप करुन ३,३९,७५० क्विंटल पोती साखरेचे उत्पादन केलेले आहे. सरासरी साखर उतारा १०.३६ मिळालेला आहे.
स्पर्धेत टिकून ऊसाला जादा दर देणेसाठी सहप्रकल्प म्हणून आपण डिस्टीलरी प्रकल्प उभारणीसाठी प्रयत्नशिल आहोत. त्यासाठीचा आवश्यक प्रस्ताव शासनदरबारी सादर केलेला आहे.
लवकरच डिस्टीलरी कार्यान्वीत करण्याचे संचालक मंडळाचे धोरण असल्याचे पाटील यांनी सांगितले.
सदर प्रसंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन तानाजी खरात, कार्यकारी संचालक सुनिल दळवी, संचालक पी. बी. पाटील, औदुंबर वाडदेकर, राजेंद्र चरणु पाटील, भारत बेदरे, बसवराज पाटील,
गौरीशंकर बुरकुल, मुरलीधर दत्तू, भिवा दोलतडे, महादेव लुगडे, गोपाळ भगरे, दयानंद सोनगे, गौडाप्पा बिराजदार, दिगंबर भाकरे, रेवणसिद्ध लिगाडे, तानाजी कांबळे, तानाजी काकडे, सुरेश कोळेकर आदी उपस्थित होते.
दरम्यान 15 जानेवारी पर्यंतची तोडणी ठेकेदार यांची बिले देखील अदा करण्यात आली आहेत तसेच येणाऱ्या काळात कारखान्याची क्षमता वाढणार असल्याची माहिती चेअरमन शिवानंद पाटील यांनी दिले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज