टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील सर्व मराठा बांधवांना साखळी उपोषणाची पुढील दिशा ठरविण्यासाठी आज आता सायंकाळी 7 वाजता दामाजी चौकात तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
सकल मराठा समाजातील सर्व मराठा बांधवांना कळविण्यात येते की आपले बंधू मराठायुद्धा मनोज जरांगे-पाटील यांचे मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी सुरू असलेल्या आमरण उपोषणामुळे त्यांची तब्येत ढासळत चालली आहे.
मंगळवेढ्यातील उपोषणाची तीव्रता वाढणार
ही गोष्ट आपल्या मराठा समाजाला परवडण्यासारखी नाही तरी मंगळवेढयात सुरू असलेल्या साखळी उपोषणाची तीव्रता वाढविण्यासाठी व
पुढील दिशा ठरविण्यासाठी आज सायंकाळी ७:०० वाजता दामाजी चौकातील उपोषणस्थळी तातडीची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे तरी सर्व मराठा बांधवांनी वेळेवर सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.
जरांगे पाटलांची प्रकृती खालावली
मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला चाळीस दिवसांचा वेळ दिला होता. मात्र चाळीस दिवसांत आरक्षण न मिळाल्यानं मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत.
त्यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. जरांगे पाटील यांनी पाणी देखील पिलेलं नाहीये, त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली आहे.
आज सकाळी त्यांची तपासणी करण्यासाठी आरोग्य पथक आले होते, मात्र त्यांनी तपासणी करण्यासाठी नकार दिला आहे. आज सकाळपासून ते उठले देखील नाही येत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज