टीम मंगळवेढा टाईम्स।
आठवडी बाजार करुन गावाकडे परतणार्या प्रताप सोपान पोतदार (वय 53, रा.मरवडे) या मोटर सायकलस्वारास अज्ञात वाहनाने भरधाव वेगात येवून ठोकरल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला असून
या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना मंगळवेढा-मरवडे रोडवर घडली आहे.
या घटनेची हकीकत अशी, यातील मयत प्रताप सोपान पोतदार हे मोटर सायकल सुझूकी क्र.एम.एच.12 ऐ. डब्ल्यू 9747 या गाडीवरुन दुपारी 2 वाजता मंगळवेढा येथील आठवडी बाजारात भाजीपाला व किराणा खरेदीसाठी आले होते.
ते खरेदी करुन मरवडे गावाकडे परत जात असताना मंगळवेढा-मरवडे मार्गावरील महालक्ष्मी वॉटर पॉइंट भालेवाडी पाटी जवळ मरवडे दिशेने येणार्या
अज्ञात वाहन चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगात व निष्काळजीपणे चालवून मयताच्या गाडीस डाव्या बाजूस जोराची धडक देवून त्याचा डावा हात कोपर्यामधून तुटून गंभीर दु:खापत करुन त्याच्या मरणास कारणीभूत ठरला आहे.
दरम्यान या अपघातात मोटर सायकलचे 30 हजाराचे नुकसारन करुन अपघाताची खबर न देता फरार झाला असल्याचे मयताचा मुलगा अमर प्रताप पोतदार याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज