मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
पंढरपुरातून उचलून आणलेल्या महिलेचा खून करून दोन दिवस पडक्या घरात ठेवल्याची माहिती आरोपींनी पोलिसांना दिल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्ढे व पथकाचा खुनाचा छडा लावण्याचा प्रयत्न चालूच आहे.
प्रेयसी किरण सावत हिने आत्महत्या केल्याचे भासवण्यासाठी पाटखळ येथे घरासमोरील कडब्याच्या गंजीत अनोळखी महिलेचा खून करून तिची ओळख नष्ट करून पळून जाण्याचा कट पोलिसांना २४ तासात उघड करता आला,
परंतु जाळलेली महिला कोण हे ७२ तास झाले तरी कोण हे समजलेले नाही. पोलीस उपनिरीक्षक विजय पिसे, नागेश बनकर, फॉरेन्सिक पथकाचे महेश पोरे, रुक्मिणी तोडकरी, तुकाराम कोळी, वैभव हाके व दोन शासकीय पंचांनी आरोपीला घेऊन खुनाच्या घटनेच तपास केला.
घराजवळच रुमालाने गळा आवळला
आरोपीने दि.११ जुलै रोजी दुपारी ३:४५ च्या दरम्यान पंढरपूर ते गोपाळपूर रोडवर वरून अज्ञात महिलेला फसवून मोटरसायकलवर घेतले. ओझेवाडी मार्गे दामाजी कारखान्या जवळील चौकातून उचेठाण, बठाण, ब्रह्मपुरी वरून मंगळवेढा, कचरेवाडी मार्गे रात्री ८.३० च्या सुमारास घराजवळ पोहोचले.
घरापासून ३०० मीटर अंतरावर शेतात महिलेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपीने महिलेचा पाठलाग करून पकडले. रात्री ९ वाजण्याच्या सुमारास तिचा रुमालाने गळा दाबून खून केला.
मृतदेह चिलारीच्या (बाभळीच्या) आड चारीत ठेवला. नंतर पडक्या घरात दोन दिवस ठेवला. घटना स्थळावरून पोलिसांनी महिलेची चप्पल व काही साहित्य हस्तगत केले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज