मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । सोलापूर जिल्ह्यातील माढा येथील उपळाई बु परिसरातील आठ वर्षीय चिमुकलीवर सख्या बापानेच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणारा प्रकार घडला आहे.याबाबत पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून बापाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,पीडित अल्पवयीन मुलीवर मागील दोन वर्षापासुन ते दि.२९ फेब्रुवारी २०२० रोजी रात्री ११.३० च्या दरम्यान घरी कोणी नसताना व रात्री सर्वजण झोपलेनंतर तिला उठवुन तिचे तोंड दाबुन वेळोवेळी तिच्या बरोबर शरीर संबंध ठेवले व आम्हाला कोणाला काही बोललास तर तुम्हाला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली म्हणुन पीडितेच्या आईने पती विरूध्द गुन्हा दाखल केला आहे.पण या सगळ्या खळबळजनक प्रकारामुळे संपूर्ण परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे.
– जन्मदात्या पित्यानेच केला पोटच्या आठ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार.
– मागील दोन वर्षापासून करत होता पोटच्या मुलीवर दुष्कर्म.
– पित्याविरोधात दाखल केला बलात्कार आणि पोस्को कलमांतर्गत गुन्हा.
– बलात्कारी पिता पोलीसांच्या अटकेत.
– सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील घटना.
जगभरातील लाखो वाचक असलेले सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.mangalwedhatimes.in
This News First Publish on mangalwedhatimes.in®
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज