टीम मंगळवेढा टाईम्स ।
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली. त्यात आरोग्यमंत्रीही सहभागी झाले होते.
या बैठकीत जगातील कोरोना स्थिती, जगाच्या तुलनेत देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव याबाबत चर्चा आणि प्रेझेंटेशनही झालं.
या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्वाची माहिती दिली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काल संध्याकाळी सर्व जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेतलीआहे. या बैठकीत मास्क वापराबाबत चर्चा झाली.
मास्क सक्ती नसली तरी गर्दीच्या ठिकाणी मास्क बंधनकारक करण्यात येऊ शकतो, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.
तसंच राज्यात टेस्टिंगमध्ये वाढ, गरज भासल्यास जिनोमिक सिक्वेन्सिंग, ट्रॅक टेस्ट आणि लसीकरणात वाढ करण्यात येणार असल्याचंही टोपे यांनी यावेळी सांगितलं.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज