मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
कोल्हापूर येथे उपोषणास बसलेले खून,खंडणी,सरकारी नोकरांवर हल्ला करणे,दारू विकणे,वाळू तस्करी करणे आदी प्रकरणातील सर्व लोक असून
पत्त्याच्या क्लब सुरु करण्याची परवानगी न दिल्याने चिडून ते उपोषणास बसले असल्याची माहिती पोलिस निरिक्षण रणजित माने यांनी प्रसारमाध्यमांना दिली.
पडोळकरवाडी येथील वृध्द महिला नकुशा मदने हिचा दरोडेखोराने खून झालेली घटना माझ्या कालावधी मधील नाही.
आंदोलनकर्ते नारायण गोवे याच्या वरती खून, खंडणी, मारामारी, सरकारी नोकरांवर हल्ला करणे, दारू विकणे अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे असून
तो काही दिवसापूर्वी पोलीस ठाणे येथे येऊन पत्त्यांचा क्लब सुरू करण्याची परवानगी मागत होता. तसेच शिवसेना कार्यालय बांधण्यासाठी पैसे मागत होता.
ते न दिल्यामुळे वाळूमाफिया अण्णा आसबे याच्या मार्गदर्शनाखाली उपोषणाला बसलेला आहे. सदर आंदोलनाचा सर्व खर्च अण्णा आसबे या वाळू माफीयाने केलेला आहे.
तो देखील कोल्हापूरला यांच्यासोबत गेला आहे मात्र गुन्हेगारी शिक्का त्याच्यावर असल्यामुळे तो स्वतः उपोषणाला बसलेला नाही.
राजकुमार स्वामी हा प्रहार संघटनेचा कार्यकर्ता असून सर्व सरकारी कार्यालयात जाऊन पैसे मागत असतो ते न दिल्यास अधिकार्यांना ब्लॅकमेलींगचे धंदे करतो.
उपोषणाला बसलेले सर्वजण गुन्हेगारी वृत्तीचे आहेत. त्यांचे वाळूचे टिप्पर व जेसीबी न सोडल्यामुळे ते उपोषण करीत असल्याचे गंभीर आरोप पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी केले आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज