मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
मंगळवेढा तालुक्यातील सर्व आजी व माजी सैनिकांचे प्रश्न आज मार्गी लागणार आहेत, यासंदर्भात तहसीलदार मदन जाधव यांनी सैनिकांचा एक ही अर्ज आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत पर्यंत निकाली काढण्याचे आदेश दिले आहेत.
महसूल सप्ताह अंतर्गत मंगळवेढा तहसील कार्यालयात एक शाम शहीदोके नाम हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी ते बोलत होते.
तहसीलदार जाधव पुढे बोलताना म्हणाले की, मंगळवेढा तहसील कार्यालयात आज सोमवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत सैनिकांचा एक ही अर्ज प्रलंबित राहता कामा नये आशा सूचना त्यांनी कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. यावेळी माजी सैनिकांना येणाऱ्या अडचणी तहसीलदार यांच्यासमोर मांडल्या होत्या.
याप्रसंगी माजी सैनिक संघटनेचे सल्लागार बबन रोकडे, मंगळवेढा अध्यक्ष मल्लय्या स्वामी, भारतीय माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष गोपीनाथ माळी, बाबासाहेब पवार, चंगेचखान इनामदार, आबा लेंडवे, शहिद मेजर सुधीर घाडगे यांच्या मातोश्री बाई धर्मराज घाडगे आदीजन उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनंजय माने यांनी केले तर एक शाम शहीदोके नाम मध्ये अजित ससाणे, मारुती प्रेशाळे यांनी देशभक्ती पर गीत गायिले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तहसील कार्यालयाचे अव्वल लिपिक उमाकांत मोरे, नितीन माळी, साईनाथ आनंदेलवार, शिवाजी भोसले, अलिफ सुतार, कोळी आदींनी परिश्रम घेतले.
याप्रसंगी अव्वल कारकून गुणवंत वाघमोडे, कयुम शेख, मंडळ अधिकारी नागनाथ जोध, धनंजय इंगोले, शामबाला कुंभार व सर्व तलाठी उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज