मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।
पंढरपूर हे जिल्ह्यातील मोठे तीर्थक्षेत्र आहे, सोलापूर जिल्ह्याबद्दल बऱ्याच गोष्टी ऐकल्या होत्या आता प्रत्यक्षात काम करण्याची संधी मिळत आहे. जिल्ह्यातील धार्मिक पर्यटन स्थळांचा विकास करण्यावर माझा भर राहील असे मत नूतन जिल्हाधिकारी आशीर्वाद कुमार यांनी व्यक्त केले.
नूतन जिल्हाधिकारी यांचे पावणे बारा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आगमन झाले. निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार आणि उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले यांनी त्यांचे स्वागत केले.
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पदभार देण्याची शासकीय प्रक्रिया पूर्ण केली. यावेळी मुख्यालयातील सर्वच उपजिल्हाधिकारी तहसीलदार उपस्थित होते.
पदभार पदभार घेतल्यानंतर नूतन जिल्हाधिकारी आशीर्वाद कुमार म्हणाले की, पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील तत्कालीन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर जिल्ह्यातील सर्व खासदार आमदार यांच्या मार्गदर्शनाखाली
सोलापूर जिल्ह्याच्या विकासाला गती देणारे सुरू असलेले सर्वच कार्यक्रम यापुढेही तितक्याच प्रभावीपणे राबवणार आहे.
नूतन जिल्हाधिकारी आशीर्वाद कुमार यांचे वडील मोठे शिवभक्त असल्याने त्यांनी सोलापूर शहरातील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिरात जाऊन प्रथम दर्शन घेतले. त्यानंतर ते जिल्हाधिकारी कार्यालयात आले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज