मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।
मंगळवेढा तालुक्यातील तळसंगी येथील बबलू किराणा स्टोअर्समध्ये बेकायदा दारू विक्री करणाऱ्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकून १४०० रुपये किमतीची दारू जप्त करीत दारू विक्रेता महिला रुपाली विजय महानूर (वय ३१) हिच्या विरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेची हकिकत अशी, अवैध धंदयावर कारवाई करण्याचे फर्मान प्रशिक्षणार्थी पोलिस अधिकारी नयोमी साटम यांनी दिल्याने बोराळे दुरक्षेत्रात सहाय्यक पोलिस निरिक्षक बापू पिंगळे, पोलिस हवालदार महेश कोळी असे कारवाईची मोहिम राबविताना
तळसंगी येथील बबलू किराणा स्टोअर्समध्ये एक महिला चक्क दुकानात दारू विक्री करीत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळताच सदर ठिकाणी जावून खात्री केल्यावर यातील आरोपी रुपाली महानूर हिने पिशवीमध्ये
१४०० रुपये किमतीच्या २० देशी संत्रा बाटल्या बेकायदेशीररित्या ठेवून त्याची विक्री करीत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी सदर दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत.
दरम्यान चक्क दारू किराणा दुकानात अन्य साहित्यासोबत विक्रीस ठेवल्याने नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त होत असून या दुकानदारांना पोलिस खात्याची भिती आहे की नाही असा संतापजनक सवाल केला जात केला जात आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज